आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमधील अंतर्गत राजकीय "वाद' पुन्हा जुन्या वळणावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- विधानसभानिवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेले काँग्रेसचे पदाधिकारी उमेदवार निश्चित झाल्यानंतर पुन्हा विखुरलेले दिसत आहे. प्रमुख पदाधिकारी भूमिगत झाले असून अंतर्गत मतभेद, गटा-तटांचे राजकारण पुन्हा जुन्या वळणावर आल्याने ऐन निवडणुकीत या गोष्टीमुळे पक्षाचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकाराकडे पक्षानेदेखील कानाडोळा केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था आणखीणच अवघड झाली आहे. पक्षांतर्गत गटबाजी, आरोप-प्रत्यारोपांच्या माध्यमातून पक्ष जिवंत ठेवणा-या काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत सोईस्कर भूमिका घेतल्यामुळे ऐन निवडणुकीत काँग्रेसला स्पर्धेत टिकणे अवघड झाले आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतल्यामुळे प्रचाराचे मुद्दे, विजयाची समीकरणे ही व्यक्तिकेंद्रित झाली आहेत. त्यात काँग्रेसचे उमेदवार कमी पडत आहेत.
अंतर्गत वादाकडे पक्षश्रेष्ठींनी केला कानाडोळा; कलहामुळे विधानसभा निवडणुकीत नुकसानीची शक्यता
घरातच सुरू झाले भांडण
जामनेर मतदारसंघ :जामनेरात ज्योत्स्ना विसपुते यांना उमेदवारी मिळाली असल्याने संजय गरुड, डी.के. पाटील यांचा काँग्रेसमधून प्रमुख गट राष्ट्रवादीत गेल्याने काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. काँग्रेस स्पर्धेत नसल्याचे चित्र आहे. त्यातही पक्षनिधी आणि अंतर्गत गटबाजीची भांडणे सुरूच आहेत.
अमळनेर मतदारसंघ : अनेकदावेदार उमेदवारीसाठी स्पर्धेत असताना गिरीश पाटील यांना मिळालेली संधी इतर गटांसाठी नाराजीचे कारण बनली आहे. पक्षाची एकाकी झुंज असली तरी उमेदवार प्रमुख स्पर्धेत झाकोळला गेला.
मुक्ताईनगर मतदारसंघ : काँग्रेसयुवक संघटनेच्या माध्यमातून पक्षात सक्रिय असलेल्या योगेंद्रसिंग पाटील यांच्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या प्रबळ पक्षांच्या विरोधात लढा देणे सोपे नाही. या मतदारसंघातील स्थानिक राजकारणाचे संदर्भ वेगळे असल्याने काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही.
एरंडोल मतदारसंघ : शिवसेना,राष्ट्रवादी, भाजप आणि मनसे या प्रमुख पक्षांमध्ये चौरंगी लढत असल्याचे चित्र आहे. त्यात काँग्रेसने दिलेल्या उमेदवाराला राजकीय वलय असले तरी प्रमुखांच्या लढतीत काँग्रेसचे नाव गृहित धरले जात नाही.
रावेर मतदारसंघ : रावेरमध्येविद्यमान आमदार शिरीष चौधरी काँग्रेसतर्फे रिंगणात आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे त्यांच्यापुढे तगडे आव्हान असल्याने या मतदारसंघात अटीतटीची लढत आहे.
चोपडा मतदारसंघ : बहुरंगीलढतीमध्ये राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे आणि अपक्षदेखील काँग्रेसहून अधिक चर्चेत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या चिन्हावर मते मिळवण्याचे आव्हान उमेदवार ज्ञानेश्वर भादले यांच्यापुढे आहे.
भुसावळ मतदारसंघ : भाजप,राष्ट्रवादी आणि शिवसेना या प्रमुख पक्षांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तेथे काँग्रेसच्या उमेदवार पुष्पा सोनवणे स्पर्धेत नसल्याची स्थिती आहे.
चाळीसगाव मतदारसंघ : जिल्ह्यातीलइतर मतदारसंघाप्रमाणे काँग्रेसची येथेही फारशी चांगली अवस्था नाही. पक्षाचा हक्काचा मतदार जोडणे, पदाधिकाऱ्यांना एकत्र आणण्याचे आव्हान उमेदवार अशोक खलाणे यांच्यापुढे आहे.
जळगाव ग्रामीण मतदारसंघ : जळगावातशिवसेना-राष्ट्रवादीच्या थेट लढतीमध्ये भाजपने रंगत आणली आहे. काँग्रेसचे डी.जी. पाटील यांना तिघांची वोटबँक फोडण्याचे आव्हान आहे. अपुऱ्या यंत्रणेमुळे प्रत्येक गावात पोहोचण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
पाचोरा मतदारसंघ : पंचरंगीलढत असलेल्या पाचोऱ्यात उमेदवार प्रदीप पवार यांना शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे या प्रमुख पक्षांचे आव्हान आहे. काँग्रेसचे उत्तम महाजन हे भाजपचे उमेदवार झाल्यामुळे त्याचाही फटका पवार यांना बसेल. पाचोऱ्यात काँग्रेसचा प्रभाव कमी असल्याने पवारांपुढे अडचणी आहेत.
जळगाव शहर मतदारसंघ : उमेदवारीसाठीसर्वाधिक स्पर्धा असलेल्या शहर मतदारसंघात उमेदवार निश्चित होताच अनेक जण भूमिगत झाले आहेत. दिवसा पक्षाचे झेंडे मिरवणाऱ्यांचा रात्रीचा अजेंडा दुसराच आहे. पक्षांतर्गत कारवाया, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा यांचे उमेदवार डॉ. राधेश्याम चौधरींपुढे आव्हान आहे.