आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलमध्ये राहून निवडून दिल्याचे साक्षीदार व्हाल का?, एकनाथ खडसेंचा जळगावात मतदारांना सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव/नशिराबाद- जेलमध्येराहू, पैसे खाऊ पुन्हा निवडून येऊ ही पैशाची मस्ती आहे. घोटाळे करणाऱ्या, बँका बुडवणाऱ्यांना जेलमध्ये राहूनदेखील निवडून दिले, याचे साक्षीदार तुम्ही बनू पाहता का? घरकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपीला मतदान करणार का? असा सवाल माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला.
जळगाव शहरात शुक्रवारी रात्री भाजप उमेदवार सुरेश भोळे यांच्या प्रचारार्थ खडसेंची जाहीर सभा झाली. यात खडसेंनी जळगावातील स्थानिक प्रश्नांसह राज्य पातळीवरील विषयांना हात घातला. राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना जळगाव शहरातील घरकुल घोटाळ्यातील आरोपी शिवसेनेचे उमेदवार सुरेश जैन माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर तोंडसुख घेतले. सुरेश जैन यांना जामीन मिळत नसल्याने ते सुटू शकत नाहीत, मग त्यांना मतदान करून काय उपयोग? असा सवालही त्यांनी केला. शहरातील विकासाचा खेळखंडोबा झाल्याचे सांगत घरकुल घोटाळ्यामुळे सगळे सह्याजीराव जेलमध्ये गेले. त्यात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचादेखील समावेश आहे. आता मतदारांची खरी कसोटी आहे. पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप सुरेश जैन यांची शिवसेना म्हणते; मात्र संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे खंजीर कोणी खुपसला. विधान परिषद निवडणुकीत निखिल युतीचा उमेदवार असताना मनीष जैन यांना आमदार केले. एका तरुण मुलाचा बळी घेण्याचे पाप त्यांनी केल्याचा उल्लेखही खडसेंनी केला. राज्यात सत्ता आल्यानंतर सगळ्यात अगोदर एलबीटी रद्द करू. महामार्ग शहराबाहेरून गेला तरी महामार्गाचे काम गडकरींच्या माध्यमातून महिनाभरात करू. फुले मार्केटचाही प्रश्न साेडवण्याचे आश्वासन व्यापा-यांना दिले.
200 मुस्लिम तरुण भाजपत
नशिराबादच्यासभेस व्यासपीठावर उमेदवार पी.सी. पाटील, माजी खासदार वाय.जी. महाजन आदी उपस्थित होते. या वेळी २०० मुस्लिम तरुणांनी भाजपत प्रवेश केला.
युती उद्धव ठाकरेंनीच तोडली
मलामुख्यमंत्रिपदात रस नाही पण राज्यात सत्ता बदलाला माझे पहिले प्राधान्य असेल. युती तुटण्यास उद्धव ठाकरे कारणीभूत असल्याचे सांगत ते 152 च्या खाली यायला तयार नव्हते, असाही उल्लेख केला.