आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान केंद्रांवर होणार मतदारांचे स्वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मतदानकरण्यासाठी आलेल्या मतदारांना खासगी, कौटुंबिक समारंभात गेल्यासारखे वाटावे, प्रसन्न, मंगलमय वातावरण निर्मिती करून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने प्रत्येक मतदार संघात एक आदर्श मतदान केंद्र उभारले जाणार आहे. या केंद्रावर ढोल-नगारे, तुता-या वाजवून तसेच काही ठिकाणी गुलाबाचे फूल देऊन तर कोठे औक्षण करून मतदारांचे स्वागत केले जाणार आहे.
पडक्या शाळेतील खोल्यांपुढे लागलेल्या मतदारांच्या रांगा, पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती, मतदान यादीत नाव शोधणे, केंद्रप्रमुख, पोलिसांशी हुज्जत घातल्यानंतर मतदान करून मनस्ताप करत घरी परतणारे मतदार हे नेहमीचे चित्र असल्याने अनेक जण मतदान करणे टाळतात. हे चित्र बदलण्यासाठी आयाेगाने पुढाकार घेतला आहे. मतदारांना सुखद धक्का देण्यासाठी आपल्या स्तरावर एका मतदान केंद्रावर वेगळा प्रयाेग करण्याची मुभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे या वेळी मतदान केंद्रासमोर रांगोळ्या काढून ढोल, नगारे वाजवत मतदारांचे स्वागत करण्यात येणार आहे. काही ठिकाणी गुलाबाची फुले, थंड पाण्याची व्यवस्था, मतदान केंद्राची रंग-रंगोटी करून प्रसन्न वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यात ११ मतदान केंद्रांत निवडणूक निर्णय अधिका-यांनी एका केंद्राची निवड केली असून तेथे नावीण्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे. जळगाव शहर मतदारसंघात गणेश कॉलनी रस्त्यावरील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम शाळेतील केंद्राची निवड करण्यात आली आहे. 188 क्रमांच्या केंद्राची रंगरंगोटी केली जाणार आहे. रांगोळी काढून मतदारांचे फूल देऊन स्वागत केले जाणार आहे. मतदारांसाठी पाण्याची व्यवस्था केली जाईल.
जिल्ह्यातील सर्व मतदारांना मतदार यादीतील नाव, भाग क्रमांक, अनुक्रमांक मतदान केंद्रांची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एनआयसीमध्ये मतदार मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. तसेच 0257-2221414 याक्रमांकावरही सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी एका क्रमांकाच्या 12 लाइन तयार करण्यात आल्‍या आहेत.अमळनेर येथील नगरपालिका माध्यमिक शाळेत शुक्रवारी आयोगाच्या उपक्रमाची रंगीत तालीम करण्यात आली.
मतदान केंद्राबाबत केवळ माहिती मिळू शकेल
मतदारांनामतदार यादी क्रमांक, अनुक्रमांक, मतदान केंद्र याबाबतची केवळ माहिती मिळू शकेल. यादीत नाव नसल्यास लगेच नावाचा समावेश मात्र होऊ शकणार नाही. मनोहर चौधरी, उपजिल्हाधिकारी,निवडणूक