आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनस्ताप टाळण्यासाठी आजच शोधा मतदार यादीत तुमचे नाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदार यादीत नाव शोधल्यामुळे नावे वगळण्यात आलेल्या मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला होता. आता विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 15 रोजी मतदान होत आहे. त्या दिवशी नाव शोधण्याची धडपड करून यादीत नाव नसल्यामुळे होणारा मनस्ताप टाळण्यासाठी मतदारांनी पाच दिवसआधीच मतदार यादी आपले नाव शोधावे लागते. त्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्‍या आहेत.
मतदार वगळणी अभियानात पत्ता, नाव फोटो मुळे मिळून आलेल्या अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली होती. जुने मतदार असल्यामुळे आपले नाव असेलच, या आशेवर अनेक मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदानाला जाण्यापूर्वी मतदान यादी चाळून पाहिली नव्हती. त्यामुळे ऐनवेळी नाव आढळल्यामुळे अनेकांनी शासकीय यंत्रणेला दोषी धरून नाराजी व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीत हीच स्थिती उद्भवू नये म्हणून मतदारांनीच काळजी घेणे आवश्यक असून, त्यादृष्टीने प्रशासनानेही खबरदारी घेतली आहे.
आता नाव समाविष्ट करणे अशक्य
यादीतनाव नसलेल्या मतदारांना आता नोंदणी करता येणार असून, नियमित प्रक्रियेनुसार त्यांची नावनोंदणी केली जाणार आहे. मात्र, अशा मतदारांना १५ ऑक्‍टोबर राजी मतदानापासून वंचितच राहावे लागणार आहे. त्यानंतर येणाऱ्या निवडणुकीसाठी त्यांचे नाव ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे ऐनवेळी मनस्ताप नको म्हणून मतदारांनी मतदानाच्या एक दिवसआधीच यादीत नाव असल्याची खात्री करणे गरजेचे आहे.
मतदान केंद्रांवर यादी उपलब्ध
मतदारांच्यासोयीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय इलेक्शन कमिशनच्या ‘सीईओ या संकेतस्थळावरही ऑनलाइन यादीत नाव शोधता येणार आहे. त्यासाठी हे संकेतस्थळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाला लिंक करण्यात आले आहे.
मतदानाचा टक्का वाढवण्याचे प्रयत्न
मतदानाचाटक्का वाढवण्यासाठी ग्रामसभा, घरपोच वोटर स्लिप पाठवणे, पथनाट्य, जाहिराती यासारखे प्रयोग प्रशासनाकडून केले जात आहेत. निवडणूक आयोगाने मतदारांना केंद्रावर अधिकाधिक सुविधा देण्यावर भर दिला आहे. त्यातून आदर्श मतदान केंद्राची संकल्पना पुढे आहे.