आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादामुळे ज्योतिषशास्त्राचे संशोधन अडकले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ब्रम्हांडातील चार ते साडेचार टक्के गोष्टीच ज्ञात आहेत. शास्त्रज्ञ त्याच्या शोधात अविरत प्रयत्नशील आहेत. तथापि, ज्योतिषशास्त्राचा उपयोग हवामान आणि शेती कामाशीदेखील निगडीत आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यापीठामध्ये ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक्रम सुरू व्हावेत आणि त्या माध्यमातून संशोधनाचे काम हाती घेतले जावे.
ज्योतिषशास्त्राला एक मानणारा गट आणि दुसरा न मानणा-यागटातील वादामुळेच संशोधनाचे काम रखडल्याची खंत महाराष्ट्र राज्य ज्योतिष परिषदेचे राज्य अध्यक्ष ना.रा. बुटले यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.

० एकीकडे ज्योतिषशास्त्राचे महत्त्व वाढत आहे. पूर्वी ठरावीक घराण्यात शास्त्र परंपरागत चालायचे. आता तर जाती-भेद विरहित ज्ञान मिळायला लागले आहे. तसेच आत्मविश्वास वाढवण्याचे काम ज्योतिषशास्त्र शिकवते.
० ज्योतिषशास्त्राची आचारसंहिता पाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. अभ्यासाने मिळवलेल्या ज्ञानातून एखाद्या याचकाला त्याच्या संकटातून बाहेर काढणे खूप मोठे काम आहे. त्यामुळे संबंधित व्यक्ती समोर आल्याशिवाय कुठलेही भविष्य वर्तवू नये. पूर्वी ज्योतिषाला राजाश्रय होता, त्याच्या माध्यमातून मार्गदर्शनाचे काम व्हायचे. परंतु आज तो
राहिलेला नाही.
० राशीनुसार खड्यांना महत्त्व आहे; परंतु, कुठल्या ग्रहासाठी कोणते खडे वापरायचे आणि ते खडे किती प्रभावशाली आहेत, याविषयीचे ज्ञानदेखील अभ्यासकांना नसते. पोटाच्या चिंतेमुळे ज्योतिषशास्त्राला वेगळे वळण दिले जात आहे. एका खड्याचा प्रभाव सहा ते पाच वर्षांपर्यंत राहतो.
० ज्योतिषशास्त्र स्वायत्त आहे. त्यामुळे त्याला शासनाची मान्यता नाही. केवळ रामटेक येथील कालिदास संशोधन विद्यापीठाला शासनाची मान्यता आहे. यात बीए इन वैदिक ज्योतिष, एमए इन वैदिक ज्योतिष आणि पीएचडी इन वैदिक ज्योतिष हे अभ्यासक्रम शिकवले जातात. अन्य ठिकाणी स्थानिक संस्था आणि राज्य परिषदेमार्फत ज्योतिषशास्त्राचे अभ्यास वर्ग राबवले जातात.
० ज्योतिषशास्त्राला एक मानणारा आणि दुसरा न मानणारा गट आहे. मानणारा गट विरोधामुळे संशोधनाचे काम हाती घेत नाही तर न मानणा-यागटाकडून संशोधन करण्याची अपेक्षा नाही, त्यामुळे हे कार्य रखडले आहे. परंतु, ज्योतिषशास्त्राचे संशोधन झाल्यास ते अनेक ठिकाणी उपयुक्त ठरू शकेल.
० जाहिरातीच्या माध्यमातून हनुमान कवच आणि रत्नांच्या माध्यमातून व्यवसाय सुरू झालेला आहे. यातून ज्योतिषशास्त्र बदनाम होत आहे. ज्योतिषांनी प्रामाणिक राहून येणा-याव्यक्तीचे समाधान करायला हवे. कालसर्पाची शांती, मंगळदोष असे सांगून काही मंडळींनी व्यवसाय थाटला आहे. तो बंद झाला पाहिजे. याबाबत दक्षता घ्यायला हवी.