आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात शेजारणीला जाळून मारण्याचा प्रयत्न; पाटील-मोरे कुटूंबियात जुंपले युद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दोन वेगवेगळया घरातून बाहेर जाण्यासाठी असलेल्या प्रवेशव्दारावरून शेजार्‍यांमध्ये सोमवारी वाद झाला. हा वाद विकोपाला जावून एका महिलेच्या अंगावर रॉकेल टाकण्यात झाले. शहरातील निवृत्तीनगर येथील शालिनी मोरे आणि वैशाली पाटील या दोन महिलांमध्ये गेल्या दीड वर्षापासून या मुद्यावरून भांडण सुरू आहे. अखेर सोमवारी शालिनी यांनी वैशाली यांच्या अंगावर रॉकेल ओतून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत वैशाली पाटील जिल्हा रुग्णालयात पोहचल्या. मात्र वैशाली यांनी स्वत:च अंगावर रॉकेल ओतले असल्याचे शालिनी मोरे यांनी पोलिसांना सांगितले आहे.
दोघांची घरे एकाच रांगेत आहेत. सोमवारी सकाळी 8.00 वाजता दोघा कुटुंबातील लहान मुलांच्या खेळण्यावरून पुन्हा वाद झाला. पाहता पाहता दुपारपर्यंत वाद विकोपाला गेला अन् दोघाही महिलांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून आपापली कैफियत मांडली. पोलिसांनी दोघांचेही अर्ज स्वीकारून तपासला सुरुवात केली आहे.
मोरे कुटुंबाकडून धमकी
शालिनी यांचे पती अडावद पोलिस ठाण्यात ड्रायव्हर पदावर नोकरीला असल्यामुळे आमचे कुणीच काही बिघडवू शकणार नाही. अशा धमक्या देऊन दीड वर्षांपासून ते मला व माझ्या पतीला शिवीगाळ करीत असतात. आज त्यांनी मला जाळून मारण्याचा प्रयत्न केला.
-वैशाली पाटील
पाटील कुटुंबाकडून धोका
शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना हाताशी धरून ते माझ्या कुटुंबाला धमक्या देत असतात. सोमवारी शिवसेनेचे रावसाहेब पाटील, दोन महिला आणि 30-40 गुंडांसह मला जीवे ठार मारण्यासाठी घरी आले. शिवसेनेच्या महिलांनी मला ‘तुझे वस्त्रहरण करू’ अशी धमकी दिली. माझ्या कुटंबाला त्यांच्याकडून धोका आहे.- - शालिनी मोरे