आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन सणवारांत शहरातील एटीएम बंद; पैसे न मिळाल्याने बहिणींची पंचाईत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सोमवारी नारळी पौर्णिमा रक्षाबंधनसाठी बाजारात तेजी होती. याच पार्श्वभूमीवर एटीएमचा वापरही वाढला, मात्र नेहमीप्रमाणे शहरातील बरेच एटीएम बंद असल्याने बँकेतून व्यवहार झाले. यामुळे बँक कर्मचाऱ्यांना कामाचा ताण वाढला तर दुसरीकडे सणासुदीलाच ग्राहकांना पैशांसाठी भटकंती करावी लागली. 
 
शहरात सोमवारी बऱ्याच ठिकाणी बंद होते. ज्या ठिकाणी एटीएम सुरु होते त्या ठिकाणी ग्राहकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सोमवारी रक्षा बंधन सणानिमित्त बाजारात गर्दी होती. यामुळे एटीएमचा वापरही वाढला होता. याच दरम्यान रविवारी बँकेला सुटी असल्याने बहुतांश एटीएममध्ये कॅश भरणा झाला नव्हता. त्याचा ताप नागरिकांना सोसावा लागला. 
 
सोमवारी रक्षाबंधनाचा सण होता. त्यानिमित्त माहेरी आलेल्या बहिणींनी लाडक्या भाऊरायाला गिफ्ट देण्याचे नियोजन केले होते. परंतु एटीएममध्ये पैसे मिळाल्यामुळे त्यांची ऐनवेळी पंचाईत झाली. त्यामुळे त्यांनी बँकेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. सणाच्या काळात निदान बँकांनी एटीएममध्ये पैसे भरून ठेवावे, अशी मागणी शीतल पाटील यांनी केली आहे. 

बहिणींची पंचाईत 

बातम्या आणखी आहेत...