आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धुळ्यात अॅट्रॉसिटी समर्थनार्थ संघर्ष महामोर्चा, बसस्थानकाचे तात्पूरते स्थलांतर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करुन शनिवारी सकाळी अॅट्राॅसिटी संघर्ष महामाेर्चाला सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील खेड्यापाड्यातून लोक मोर्चात सहभागी होण्यासाठी आले आहेत. शहरातील प्रमुख रस्ते निळ्या झेंड्यांनी फुलून गेले आहे. जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांमुळे वाहतूकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. आजच्या दिवसापूरते मुख्य बसस्थानकाचे स्थालांतर करण्यात आले आहे. आज देशभर संविधान दिन साजरा होत असताना, धुळ्यात निघालेल्या मोर्चाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
असा आहे वाहतूकीतील बदल
- मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याने वाहतुकीची काेंडी हाेऊ नये यासाठी शहरातील विविध भागांतील रस्त्यांवरील वाहतूक सकाळी सहा ते सायंकाळी सात या वेळेत वळवण्यात आली असल्याची माहिती पाेलिस अधीक्षक चैतन्या एस. यांनी दिली.
- मोर्चाला भारतरत्न डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली असून मोर्चाचा समारोप जिल्हा कारागृहासमाेर होणार आहे.
हे मार्ग आज बंद
शनिवारी वाहतूकव्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार वरखेडी राेड, चाळीसगाव चाैफुली, साेसायटी पेट्राेलपंप (पाण्याची टाकी) जवळील रस्ता, चक्करबर्डी राेड, जुना टाेल नाका, साक्री बायपास, अभियंतानगर हे रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात अाले अाहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा िकंवा माेर्चाच्या वेळेत महत्त्वाचे काम असेल तरच शहरात यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बसस्थानकाचे तात्पुरते स्थलांतर
- एस.टी.महामंडळाच्या बसेसचा मार्ग वळवण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...