आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंच निवडीवरून कासट यांच्या कार्यालयावर हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पाळधी(ता. धरणगाव) येथे सरपंचपदाच्या निवडीवरून विकास पॅनलचे प्रमुख शरद कासट यांच्या कार्यालयावर मंगळवारी सकाळी हल्ला चढवण्यात आला. सुमारे ७० ते ८० जणांच्या जमावाने केलेल्या तुफान दगडफेकीत सहा जण गंभीर जखमी झाले अाहे. या हल्ल्यात ४८ हजारांचे नुकसान तर सुमारे तीन लाखांचा एेवज चाेरी झाला अाहे. लाठ्या-काठ्या, लोखंडी सळया घेतलेल्या बेभान जमावाने कासट कुटूंबियांतील चार जणांना बेदम मारहाण करून कार्यालयात तोडफोड केली. त्याचबरोबर दगड-विटांचा मारा करून कार्यालय तसेच गाड्यांचे नुकसान केले.दरम्यान, कासट यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या बुधवारी पाळधी येथील व्यापाऱ्यांनी बंदचे आवाहन केले आहे.

राष्ट्रीय महामार्गालगत शरद शिवनारायण कासट यांचे कार्यालय अाणि निवासस्थान अाहे. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता अचानक माजी पंचायत समिती सभापती राजू पंढरीनाथ पाटील, सुनील रामदास पाटील यांच्यासह ७० ते ८० जण कासट यांच्या कार्यालयावर लाठ्या- काठ्या, लाेखंडी सळया घेऊन चाल करून अाले. त्यांनी सुरुवातीला कार्यालयावर तुफान दगडफेक केली. त्यानंतर अात घुसून टेबल, खुर्च्या अाणि काचेची ताेडफाेड केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा कंट्राेल रूम, टीव्ही याचीही हल्लेखाेरांनी ताेडफाेड केली. हल्लेखाेरांनी शैलेश शरद कासट (वय ४०), आशिष अशाेक कासट (वय ४५), अनिल अशाेक कासट (वय ३८), अमाेल शरद कासट (वय ३६), श्यामकांत पाटील, मनाेज रतन नन्नवरे यांना मारहाण केली. त्यात ते जखमी झाले अाहेत. अर्धातास गोंधळ घातल्यानंतर हल्लेखाेर गावाच्या दिशेने निघून गेले.
हल्ल्या प्रकरणी शैलेश कासट यांनी धरणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली अाहे. यात राजू पाटील, सुनील पाटील, सुभाष महारू कुंभार, रवींद्र भामरे, जितेंद्र देविदास पाटील, सुधीर साेपान पाटील, सादिक महेबुब पटेल, चंदू भगवान पाटील, हेमंत नारायण पाटील, राजू नारायण पाटील, अनिल उर्फ टकल्या माळी, संजय चंद्रप्रकाश पांडे, विक्की सुभाष कुंभार, भुऱ्या भगवान माळी इतर ७० ते ८० जणांनी घरावर हल्ला करून माराहाण करून धमकी दिली. तसेच विटांचे तुकडे मारून गाडीचे कार्यालयाचे सुमारे ४८ हजार रुपयांचे नुकसान केले. शिवाय हातातील साेन्याचे ब्रासलेट, गळ्यातील साेन्याची चेन शर्टच्या खिशातील राेख रक्कम असे तीन लाख रुपयांचा एेवज नागरिक बळजबरीने काढून घेऊन गेले अाहे, असे फिर्यादीत म्हटले अाहे. त्यावरून धरणगाव पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अाहे. पुढील तपास पाेलिस निरीक्षक सतीश भामरे, सहा. पाेलिस निरीक्षक विजय पी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस हेड काॅन्स्टेबल चंद्रकांत पाटील राजेंद्र पाटील हे करीत अाहेत.
अशी पडली वादाची ठिणगी
पाळधी ग्रामपंचायतीच्या एकूण १७ जांगासाठी दाेन वर्षांपूर्वी निवडणूक झाली. त्यात विकास पॅनलचे उमेदवार निवडून अाले होते. तर उर्वरित १० उमेदवार निरनिराळ्या पॅनलचे होते. या १० उमेदवारांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीत सत्ता काबीज केली.तीन पॅनलमध्ये रोटेशन पध्दतीने सरपंचपदाचा कार्यकाल वाटून घेण्यात आला. सरपंचपद हे इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव अाहे. प्रत्येक गटासाठी सरपंचपद एक वर्ष ठरवून घेतले. ठरल्याप्रमाणे अाशा हेमंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सरपंचपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नवीन सरपंचपदाच्या निवडीसाठी ३० सप्टेंबरची तारीख निश्चित झाली. त्यासाठी सत्ताधारी पॅनलचे प्रमुख राजू पंढरीनाथ पाटील यांनी त्यांचे अाठ सदस्य चार दिवसांपूर्वी बाहेरगावी सहलीला पाठवले. मात्र या सत्ताधारी गटातील वैशाली पाटील अाणि श्रीवर्धन नन्नवरे हे दाेघे सदस्य सहलीला सत्ताधारी पॅनलच्या सदस्यांसाेबत गेले नाही. परंतु सदस्य कासट यांच्या सांगण्यावरून वैशाली पाटील आणि श्रीवर्धन नन्नवरे सहलीला गेले नाहीत अशी चर्चा गावात दबक्या आवाजात सुरु होती. आठ सदस्य बाहेरगावी गेल्यानंतर दोन दिवसांनी हे दोघे बाहेरगावी गेले.त्यामुळे विरोधकांचा संशय आणखीनच बळावला आणि त्यातून हा हल्ला झाला असे सांगितले जाते.
बातम्या आणखी आहेत...