आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष पोलिस महानिरीक्षकाच्या पथकावर हल्ला; 16 पोलिस जखमी; नवापुरातील लक्कडकोट येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर- महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातील नवापूर तालुक्यातील लक्कडकोट येथे काल (रविवारी) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अवैध धंद्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला झाला. यात 15-16 पोलिस कर्मचारीसह अधिकारी जखमी झाले आहेत. पोलिस वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विजय चौबे यांच्या पथकावर जुगार आणि इतर व्यवसायिकांनी पोलिसांनावर लाठीकाठीने सामूहिक हल्ला करत गावातून पडल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली.

पथकातील गाडीला कट लागला म्हणून भांडण झाले, असा युक्तिवाद पोलिस उपनिरीक्षक नितीन खैरनार यांनी केला आहे. मात्र, परिस्थिती वेगळीच होती. यात पथकातील बहुतांश पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत.

पथकातील पोलिसांवर धारदार शस्त्राने हल्ला
हेड कॉन्स्टेबल किशोर देवरे यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले आहे. नवापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असतानाही पोलिसांनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे.

अवैध धंद्येवाल्यांनकडून पोलिसांवर हल्ले करण्यात येत असतील इतर सामान्य माणसाचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे:. गुंडावर पोलिसांचा धाक उरला नसल्याचे चित्र जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे.

संयुक्त कारवाईची अपेक्षा
लक्कडकोट गाव हे गुजरात महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती भागात असल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठा जुगार येथे खेळला जातो. याठिकाणी गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद, बाराडोली, व्यारा, सोनगड नवसारी तर महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, मुंबईचे काही बडे व्यापारी जुगार खेळण्यासाठी येतात. ज्या वेळेस महाराष्ट्राचे पोलिस कारवाई करतात. त्यामुळे जुगारी गुजरात राज्यात पलायन करतात. गुजरात राज्यातील पोलिस कारवाई करते तेव्हा महाराष्ट्रात धाव घेतात यासाठी सोनगड (जि.तापी) येथील पोलिस व नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिसांनी संयुक्त विद्यमाने कारवाई केल्यास अवैध धंद्यांवर काही प्रमाणात अंकुश येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... जखमी पोलिसांचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...