आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामनेर:दाम्पत्यावर चाेरट्यांकडून हल्ला; एक लाखाचा ऐवज लंपास,शेतात राहत होते दाम्पत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाेरट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले वृद्ध दाम्पत्य. - Divya Marathi
चाेरट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले वृद्ध दाम्पत्य.
जामनेर- तालुक्यातील बेटावद बुद्रूक या गावाच्या बाहेर शेतात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला करून चार चोरट्यांनी लाखाचा ऐवज लंपास केला आहे. बुधवारी पहाटे वाजेदरम्यान हा प्रकार घडला. याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
किसन रामकृष्ण डाेंगरे (वय ८५) दगडाबाई किसन डोंगरे (वय ७६) हे वृद्ध दाम्पत्य बेटावद बुद्रूक या आपल्या गावालगत असलेल्या शेतात राहतात. शेतात गोडावून असून यात शेतमाल ठेवलेला असतो. नेहमीप्रमाणे डोंगरे दाम्पत्य मंगळवारी रात्री झोपी गेले. बुधवारी पहाटे वाजेदरम्यान चार चोरट्यांनी झोपेत असलेल्या वृद्ध दाम्पत्यावर अचानक हल्ला केला. यात किसन डोंगरे यांच्या डोक्यात तर तर दगडाबाई यांच्या हातावर विळ्याने वार केले. जखमी झालेल्या दगडाबाई यांच्या हातातील चांदीच्या पाटल्यांचे दोन जोड, कर्णफुले, अंगठी असा जवळपास लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या वेळी तीन वाजल्याचे चोरटे आपसात बोलत होते. 
 
सकाळी दगडाबाई ही जखमी अवस्थेत रस्त्यावर येऊन कुणी दिसत का? हे पहात होती. त्या वेळी गावातीलच नातेवाईक ज्ञानेश्वर डोंगरे हे शेतात जात होते. त्यांना दगडाबाई रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आली. ज्ञानेश्वर याने दगडाबाईला विचारपूस करून गावात मोबाइलवर संपर्क करून माहिती दिली. त्यांचा मुलगा काही नातेवाइक आले. त्यांनी दोघा वृद्धांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. किसन डोंगरे यांच्या डोक्यात विळ्याचा जबर वार झालेला असल्याने त्यांना २८ टाके पडले, तर दगडाबाईच्या हातावर वार असल्याने त्यांनादेखील ११ टाके पडले अाहेत. या घटनेबाबत गावात चर्चा सुरू हाेती. 
 
घटनास्थळाचा पंचनामा 
बेटावद बुद्रूक या गावातील डोंगरे कुटुंबातील वृद्ध दाम्पत्यावर हल्ला झाला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काही नागरिकांनी पोलिस ठाण्याशी संपर्क करून याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नजीर शेख पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी बेटावद येथे जाऊन घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत किसन रामकृष्ण डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील करीत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...