आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाडाेशाला दबा धरून बसलाे, बकरीजवळ टिपणार ताेच दुचाकींचा अावाज अाला अन‌् बिबट्या पळाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनील वाडेकर, डॉ.संजय गायकवाड - Divya Marathi
सुनील वाडेकर, डॉ.संजय गायकवाड

चाळीसगाव- गुरुवारी मध्यरात्री वाजता दाेन बकऱ्या अाेरडत पाय अापटू लागल्या. अाम्ही शेतातील कुडाच्या खाेलीत लपून बसलाे हाेताे. बिबट्या घुर्र अावाज करत अाला. त्याला टिपणार तितक्यात दाेन दुचाकींवरील दाेन जण जाेरजाेरात अाेरडत जात हाेेते. अन् त्या अावाजाने एका सेकंदात बिबट्या तेथून निसटला, असे अनुभव बिबट्याला टिपण्यासाठी सलग दाेन रात्र जागून काढणारे नाशिकचे वन परिक्षेत्र अधिकारी सुनील वाडेकर तसेच पशु विभागाचे उपायुक्त डाॅ.संजय गायकवाड (जळगाव) यांनी शुक्रवारी कथन केले.


वरखेडे शिवारात तीन दिवसांपूर्वीच रस्त्याला लागून असलेल्या शेतातील कुडाच्या झाेपडीसमाेर बांधलेल्या बकरीवर बिबट्याने हल्ला केला हाेता. मात्र, काहीतरी अावाज अाल्याने बकरीला तसेच साेडून बिबट्याने धुम ठाेकली हाेती. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र मानेचा अर्धा लचका तुटलेली बकरी मृत झाली. मृत बकरी अाम्ही मुद्दाम तेथेच पडू दिली. अपूर्ण शिकार पूर्ण करण्यासाठी येथेच पुन्हा बिबट्या येईल, याचा विश्वास असल्याने वन विभागाने येथे दाेन ट्रॅप कॅमेरे लावून एका शाॅर्प शुटरसह अाम्हास तैनात केले. पहिल्या दिवशी तेथे बिबट्या अाला नाही. दुसऱ्या दिवशी रात्री वाजता बिबट्या तेथे अालाच. मात्र, सारे प्रयत्न करूनही १० फुटावर असलेल्या रस्त्यावरील वाहनासह चालक, प्रवाशांच्या कल्लाेळाने बिबट्याने क्षणार्धात: डाेळ्यादेखत धूम ठाेकली. त्यामुळे प्रचंड निराशा झाली, अाम्ही अजूनही बिबट्या परत तेथे येईल, या अाशेवर असून दाेन दिवसापासून पुन्हा कडाक्याच्या थंडीत डाेळ्यात तेल घालून झाेपडीत राहून बिबट्याची प्रतीक्षा करताेय, असे सुनील वाडेकर (नासिक) डाॅ.संजय गायकवाड यांनी सांगितले.


बकऱ्याच्या खाेलीत राहताे
ज्याकुडाच्या झाेपडीत राहताेय तेथे बकऱ्या बांधण्याची जागा अाहे. अाता मात्र बिबट्याला टिपण्यासाठी बकऱ्या बाहेर अन् अाम्ही या खाेलीत अाहे. बकऱ्यांची खाेली असल्याने अातमध्ये मुत्र तसेच लेंड्यांची दुर्गंधी येते. रात्रभर सुवासिक अगरबत्ती लाऊन बिबट्याला टिपण्यासाठी प्रतीक्षा करताेय. बिबट्या कधीही उभ्या असलेल्या किंवा चालत असलेल्या माणसावर हल्ला करीत नाही. बसून किंवा अर्धवाकुन शेतात काम करणे, झाेपलेले राहणे, पाणी भरण्यासाठी वाकणे अशाच वेळी बिबट्या हल्ला करताे, असे सुनील वाडेकर यांनी सांगितले. 

 

हा परिसर माेठा अाहे. येथे घनदाट झाडी अाहेत. गाव डाेंगराने वेढलेले अाहे. बिबट्याला लपण्यासाठी पुरेशी जागा अाहे. बिबट्याच्या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाल्याने दडपण वाढले अाहे. या सर्वच कारणांमुळे वरखेडेचे रेस्क्यू अाॅपरेशन अाव्हानात्मक अाहे, असे वाडेकरांनी सांगितले. 


अाॅपरेशन अाव्हानात्मक 
नाशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाडेकर (नाशिक) तसेच पशु विभागाचे उपायुक्त डाॅ.संजय गायकवाड (जळगाव) यांनी वन्य प्राण्यांसंदर्भातील १३७ रेस्क्यू अाॅपरेशनमध्ये अातापर्यंत संयुक्तपणे सहभाग नाेंदविला अाहे. मात्र, वर‌खेडे येथील बिबट्याला टिपण्यासाठीचे रेस्क्यू अाॅपरेशन अातापर्यंतचे सर्वात माेठे िततकेच अाव्हानात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. १३७ रेस्क्यू अाॅपरेशनमध्ये बिबट्या किंवा अन्य वन्य प्राण्यास ठार मारण्याची मुळातच कधी गरज भासली नाही. ८० ते ९० त्रासदायक बिबटे गनने बेशुद्ध केले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...