आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Attractive Offers In Vehicle Market For Gudhi Padawa At Nashik, Divya Marathi

वाहनबाजारात सजली आकर्षक ऑफर्सची गुढी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आटोमोबाइल क्षेत्रात वाहनांच्या किमती कमी झाल्या आहेत. गुडीपाडव्यामुळे रोख सूट देऊन सोबत आणखी जोड ऑफर्स देत चारचाकी कंपन्या बाजारपेठेतील स्पर्धेत उतरल्या आहेत. गुढीपाडवा हा यावर्षीच्या हंगामातील जवळपास शेवटचा मुहूर्त असल्याने कंपन्यांनी कंबर कसली आहे. ऑफर्समुळे दुचाकी वाहनांची बाजारपेठही तेजीत आहे.

चारचाकीप्रमाणे दुचाकीचाही टॉप गिअर
चारचाकीप्रमाणे दुचाकी वाहनांच्या किंमतीही कमी झाल्या आहेत. चांगला मुहूर्त असल्याने दुचाकी कंपन्या हजर स्टॉकसह बाजारात उतरल्या आहेत. वाहने उपलब्ध असल्याने काही गाड्यांचे कमी वेळेत बुकिंग करून गाडी उपलब्ध होत आहेत. गुढीपाडव्याला सुमारे 1000 पेक्षाही जास्त गाड्या विक्री होतील, असा अंदाज विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे. इन्शुरन्स फी, भेटवस्तू, कमी डाऊनपेमेंट यासारख्या ऑफर्स दिल्या आहेत.

विशेष सूट अन् आकर्षक भेटवस्तू
टाटा मोटर्सने व्हीस्टा, इंडिगो, नॅनो, सफारी स्ट्रोम या गाड्यांवर 20 ते 70 हजारापर्यंत सूट जाहीर केली आहे. शेवरलेटच्या एण्जॉय, बीटवर 50 हजारापर्यंत सूट आहे. टोयोटाने इटीवोस लीवा, न्यू इटीवोस या गाड्यांवर 31 हजारपर्यंत सूट आहे. हुंदाईच्या वर्ना, इवोन, आय-10, आय -20, ग्रॅण्डंवर 28 हजारापर्यंत सूट आहे. महिंद्राने रेक्शन, एक्सयूव्ही 500 डब्ल्यू 4, व्हेरिटो व्हीब, स्कॉर्पिओ, बोलेरोवरही 30 हजारांपर्यत सूट दिली आहे.

काहींना पाडव्यानंतर मिळणार वाहने
मुहूर्त चांगला असल्याने अनेक ग्राहक काही दिवसांपासून थांबले होते. पूर्वी बुकिंग केलेल्या ग्राहकांसह अलीकडे बुकिंग केलेल्या ग्राहकांची संख्याही मोठी आहे. कंपन्यांची वाहने उपलब्ध नसल्याने पाडव्यानंतर त्यांना डिलिव्हरी मिळेल.

पाडव्यानिमित्त फग्यरुसन, स्वराज, महिंद्रा, पॅजो या कंपन्यांनी विशेष ऑफर्स दिल्या आहेत. शेतकरी आणि व्यावसायिकांचा प्रतिसाद असल्याने पाडव्याला 80 ट्रॅक्टर, रिक्षाची डिलिव्हरी होईल.