आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावातील कार बाजारात सवलतींचा पाऊस; ग्राहकांना आकर्षित करण्‍याचा फंडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- यंदाच्या मान्सूनमध्ये ऑटो मोबाइल क्षेत्रात विक्रीचे नवे उच्चांक गाठले जाऊ शकतील. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कार उत्पादक कंपन्यांची ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सवलत जाहीर केल्या आहेत. ज्यात शून्य टक्के व्याजावर कर्जपुरवठय़ापासून ते थेट रोख सवलतपर्यंतच्या ऑफर्सचा समावेश आहे.

काही कंपन्यांनी एक्स्चेंज स्कीम सोबत फ्री इन्शुरन्स देऊ केला आहे. यामागे कंपन्यांचा एप्रिल ते जून या तिमाहीत झालेला तोटा भरून काढण्याचा हेतू आहे. सातपुडा ऑटोमोबाइचे किरण बच्छाव म्हणाले की, इतर सीझनपेक्षा पावसाळ्यात ऑटोमोबाइल क्षेत्रात थोडी मंदी आहे. ती दूर करण्यासाठी कंपन्या विविध सवलती देऊन ग्राहकांना आकर्षित करतात. आदित्य होंडाचे राहुल पाटील यांनी मान्सून सवलत म्हणून फ्री सर्व्हिसिग कॅम्पचे आयोजन केले आहे.

10 हजारांपासून दोन लाखांपर्यंत
यंदा कार उत्पादक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यात कोठेही मागे राहू इच्छित नाहीत. हेच कारण आहे की 10 हजार रुपयांपासून 1 लाख 75 हजारा रुपयांपर्यंत रोख सवलतीच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. सी-डॉन व एसयूव्ही प्रकारात वेगवेगळ्या सवलत ग्राहकांसाठी आहेत. विशेषबाब ही आहे की लोकप्रिय मॉडेल्सदेखील या ऑफर्समधून सुटलेल्या नाहीत. यंदा कंपन्यांनी मध्यम र्शेणीतील कारवर लक्ष केंद्रित केले आहे. मागणी असलेल्या सर्वांधिक ऑफर्स आहेत.