आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोगी जीवनासाठी शरीराचे ऑडिट करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रात उपस्थित नागरिक.)
जळगाव - प्रत्येकव्यक्तीने निरोगी जीवन जगण्यासाठी रोज एक किलोमीटर पायी चालणे, नाडीचा वेग तपासणे आणि श्वासावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. या सर्वांचे नियमित ऑडिट करून त्यात सुधारणा केल्यास कोणालाही डॉक्टरांकडे जाण्याची गरज राहणार नाही, अशा टिप्स डॉ.शिरीष पटवर्धन यांनी दिल्या. शहरातील गंधे सभागृहात "अर्थाजन कोणासाठी?' या कार्यक्रमाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी निरोगी जीवनासाठी काय करावे, याच्या अनेक टिप्स दिल्या.

डाॅ.पटवर्धन म्हणाले की, रोज एक किलोमीटर चालावे. त्यात १८ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू नये. सकाळी उठल्यावर नाडीचा वेग तपासावा. त्यात ८५ ठोके पडले पाहिजेत. श्वास रोखताना २० सेकंदांच्या आत सुटायला नको. या परिमाणापेक्षा जास्त वेळ लागल्यास आरोग्यात बिघाड असल्याचे समजावे. मात्र, यासाठी घाबरून जाऊ नये. छोट्या- छोट्या गोष्टीतून त्यावर नियंत्रण मिळवता येते. हीच बाब लोकांना सरळ सांगितली तर पटत नाही. अर्थाजन कोणासाठी? असे उलट भाषेत सांगितले तर लवकर पटते, असा विषयामागील अर्थही त्यांनी स्पष्ट केला.

कोणताही व्यक्ती आजारी पडताना आधी त्याचे मन बिघडते, नंतर शरीरात बदल जाणवतात. त्यानंतर लक्षणे दिसतात. तसेच आजारातून बरे होतानाही मनापासूनच सुरुवात होते, असे डॉ.पटवर्धन यांनी सांगितले.

"माय सिटी माय ड्रीम' या उपक्रमांतर्गत मल्टिमीडिया फिचर्सतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संचालिका सविता नवाल, नीलम पटवर्धन, स्वामीदीप इलेक्टोगार्डचे राम भावसार, गोदावरी फाउंडेशनच्या वर्षा पाटील, महाले असोसिएटचे कांतिलाल बडाले, नयना पाटकर, सुदर्शन नवाल उपस्थित होते. सुशील नवाल यांनी प्रास्ताविक केले. अपूर्वा वाणी यांनी सूत्रसंचालन केले. प्राजक्ता पाटील यांनी आभार मानले.
निरोगी राहण्यासाठी हे करा
प्रत्येकानेदर तासाला दोन मिनिटे स्वत:साठी द्यावेत. त्यात एक मिनिट शांत बसावे, त्यानंतर एक मिनिट शरीराच्या सहज हालचाली कराव्यात, स्वसंवाद साधावा, त्यात शांत बसणे हे जगातील सर्वात श्रेष्ठ औषध आहे. पुरेशी झोप घ्यावी, सूर्यनमस्कार करावेत, योग्य आहार घ्यावा, या सर्वांची नियमित सवय लावून घेतल्यास जीवन निरोगी होईल.
मनाचे आरोग्य जपा
मनाचेआरोग्य जपताना हसत हसत नाही म्हणायला शिका, मनला विश्रांती द्या आणि खासकरून निरुत्साही लोकांपासून दूर राहावे, या गोष्टींचे पालन केल्यास मन उत्साही आनंदी राहील, असेही डॉ.पटवर्धन यांनी सांगितले.
जळगावच्या केळीची बदनामी
आरोग्यासाठीजळगावची केळी अत्यंत चांगली आहेत. अनेक व्याख्यानात या केळीचा उल्लेख आपण करतो. परंतु, डॉक्टरांनी विनाकारण केळीला बदनाम केले आहे, अशी खंतही डॉ.पटवर्धन यांनी या वेळी व्यक्त केली.
आजार टाळण्यासाठी...
कोणताहीआजार अचानक होत नाही. हळूहळू त्याचे प्रमाण वाढत जाते. त्यात जास्तवेळ टीव्हीसह स्क्रीनच्या वस्तूंचा वापर करणे, पाकीटबंद अन्नपदार्थ, तंबाखूचे सेवन केल्याने आजाराला निमंत्रण मिळते. त्यामुळे या तिन्ही बाबींपासून व्यक्तीने दूर राहावे. तसेच प्लास्टिकमध्ये बंदिस्त प्रत्येक पदार्थ सेवन केल्याने कर्करोगाला निमंत्रण देण्यासारखे आहे.
गंधे सभागृहात अायाेजित केलेल्या व्याख्यानात बाेलताना डाॅ. शिरीष पटवर्धन दुसऱ्या