आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी वितरणाचे आजपासून लेखापरीक्षण; 200 वॉटर मीटर बसवण्याच्या कामास आजपासून सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शासनाच्या सुजल निर्मल अभियानांतर्गत शहरात वितरित होणार्‍या पाण्याचे मोजमाप होणार आहे. यासाठी विविध भागात पाणीपुरवठा करणार्‍या उपजलवाहिन्यांवर 200 ठिकाणी मीटर बसविण्यात येणार आहे. या कामाला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे.
एडीसीसी इन्फोकॅड एजन्सी दोन महिने परीक्षण करून शहरातील पाणी वितरणाचे लेखापरीक्षण सादर करणार आहे. शासनाच्या सुजल निर्मल अभियानांतर्गत जळगाव शहरासाठी पाण्याची होणारी उचल आणि प्रत्यक्ष होणारा पुरवठा याचे गणित जुळवण्याचा प्रय} सुरू आहे. याचा खोलवर अभ्यास करण्यासाठी पहिल्या टप्प्यात वाघूर धरणातून पाणी उचल होणार्‍या मुख्य जलवाहिन्यांवर आतापर्यंत 30 ठिकाणी वॉटर मीटर बसविण्यात आले आहे. धरणातून जलकुंभांमध्ये पडणारे पाणी या माध्यमातून मोजमाप करण्याचे काम सुरू आहे. यापुढे जाऊन शहरातील विविध कॉलन्यांना पाणीपुरवठा करणार्‍या उपजलवाहिन्यांद्वारे किती पाणी वितरित केले जाते, याचे मोजमाप करण्यासाठी 200 ठिकाणी वॉटर मीटर बसविण्यात येणार आहे. यासाठी एडीसीसी इन्फोकॅड एजन्सीला काम देण्यात आले असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता योगेश बोरोले यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
दोन महिने होणार मोजमाप
उपजलवाहिन्यांवर बसविण्यात येणार्‍या मीटरच्या माध्यमातून कोणत्या भागात किती पाणी वितरित झाले? या संदर्भातील आकडेवारी दोन महिने मोजण्यात येणार आहे. यातून हाती येणार्‍या माहितीच्या आधारे नियुक्त केलेली एजन्सी पालिकेला पाणी वितरणाचा एकत्रित आकडेवारीचा अहवाल सादर करणार आहे.