आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad High Court Bench Critised On Advocates Work Style

वकिलांच्या कार्यपध्दतीवर खंडपीठाचे कडक ताशेरे;दडपण, दबावतंत्राबाबत न्यायमूर्तींचे कठोर भाष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नेहमी दडपण आणण्याचा प्रयत्न, दबाव तंत्र वापरून बेंच बदलवणे ही खालच्या न्यायालयात चालणारी वकिलांची कार्यपध्दती जळगाव घरकुल घोटाळ्याच्या माध्यमातून हायकोर्टात दिसत आहे, अशा शब्दांत औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी या प्रकरणातील त्रयस्थ अर्जदारांच्या वकिलांच्या कार्यपध्दतीवर ताशेरे ओढले.
मंगळवारी न्या. ठिपसे यांच्यासमोर प्रदीप रायसोनी यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. आमदार जैन यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सोमवारी न्यायालयाने सरकारी वकिलांच्या कार्यपध्दतीवर ताशेरे ओढले होते. या घोटाळ्य़ातील आरोपी माजी महापौर रायसोनी यांनी खंडपीठात दाखल केलेल्या जामीन अर्जावर 9 जानेवारी रोजी न्यायमूर्ती एम.एन.तेहलानी यांच्या न्यायालयात कामकाज झाले तेव्हा त्यांनी प्रकरण चालवण्यास नकार देत ‘नॉट बिफोर मी’ चे आदेश दिले होते. त्यामुळे मंगळवारी न्या. ठिपसे यांच्या पीठासमोर सुनावणीत न्यायमूर्तींनी फाईल उघडली नाही.
या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांचा निर्णय बाकी आहे, असे कारण सांगून त्यांनी घरकुल प्रकरणात त्रयस्थ अर्जदारांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली. विशेष सरकारी वकील अँड. प्रवीण चव्हाण यांना तुम्हाला केस चालवायची आहे का? असे न्यायमूर्तींनी विचारले तेव्हा त्यांनी होकार दिला. पुढील कामकाज 6 फेब्रुवारीला होईल. रायसोनी यांच्या वतीने अँड. सुनील मनोहर, सरकारतर्फे अँड. प्रवीण चव्हाण, तर त्रयस्थ अर्जदार नरेंद्र भास्कर पाटील यांच्यातर्फे अँड. कडू यांनी कामकाज पाहिले.