आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे प्रेमीयुुगुल सापडले जळगावात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - खुलताबाद(जि. अाैरंगाबाद) येथून पसार झालेल्या प्रेमीयुगुलाला शहर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे वाजता जळगावातून ताब्यात घेतले. हे प्रेमीयुगुल वेरूळ येथील रहिवाशी आहेत. 
एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले २३ वर्षीय मुलगा मुलगी पाच दिवसांपूर्वी खुलताबाद येथून पसार झाले हाेते. याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल झाली हाेती. त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला होता. हे दोघे जळगावातील एका मित्राकडे रहायला आले होते.
 
दरम्यान, दोघांच्या मोबाइल क्रमांकावरून त्यांचे लोकेशन पोलिसांनी ट्रेस केले होते. गुरूवारी रात्री ११ वाजता खुलताबाद पाेलिसांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात फोन वरून माहिती दिली. हे प्रेमीयुगुल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गणेश शिरसाळे दुष्यंत खैरनार या दोघांनी पहाटे वाजेपर्यंत शोध घेतला. भारतनगर येथील एका घरातून या प्रेमीयुगुलाला पहाटे वाजता ताब्यात घेण्यात आले. तोपर्यंत खुलताबाद पोलिसही जळगावात पोहचले होते. दोघांना ताब्यात घेऊन आधी शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. नोंद घेतल्यानंतर सकाळी वाजेच्या सुमारास पोलिस दोघांना घेऊन खुलताबाद येथे गेेले. 
 
बातम्या आणखी आहेत...