आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाचालक वाहतूक पाेलिसास घेऊन पळाला,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; रस्त्यात बेशिस्त लावलेली रिक्षा व्यवस्थित लावण्याचा राग आल्यामुळे चालकाने वाहतुक पोलिसाशी हुज्जत घातली. या वेळी पोलिसाने रिक्षात बसून त्याला रिक्षा वाहतूक कार्यालयात नेण्याचे सांगितले असता त्याने चक्क रिक्षा कोर्ट चौकाच्या दिशेने सुसाट पळवली. या वेळी चार पोलिसांनी त्याला नंदिनीबाई शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ अडवून ताब्यात घेतले. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजता बसस्थानकाजवळ घडली.

बसस्थानकासमाेर वाहतूक पोलिस सुशील चाैधरी ड्यूटीवर हाेते. त्यांनी रिक्षाचालक माेहसीन शेख यास रस्त्यात बेशिस्त उभी असलेली रिक्षा (एमएच-१९-व्ही-६०९८) व्यवस्थित लावण्यास सांगितले. त्या वेळी चालकाने चौधरींशी हुज्जत घातली. त्यामुळे चाैधरी शेख याच्या रिक्षात बसले त्यांनी रिक्षा शहर वाहतूक कार्यालयात घेण्यास सांगितले. या वेळी शेख याने रिक्षा सुरू करून ती शहर वाहतूक विभागाच्या कार्यालयात नेता भरधाव वेगाने काेर्ट चाैकाकडे न्यायला सुरुवात केली. हा प्रकार वाहतूक पोलिस सतीश जाेशी अाणि इतर तिघांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पाठलाग करून रिक्षा नंदिनीबाई विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमाेर अडवून चालकास ताब्यात घेतले. शेख यास वाहतूक कार्यालयात अाणल्यानंतर तेथेही त्याने गाेंधळ घातला. तसेच त्याची चाचणी घेतली असता त्याने दारू प्राश्न केल्याचे पाेलिसांना निदर्शान अाले.