आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात रिक्षाचालकाचा खून; अनैतिक संबंधाचा संशय; महिलेस केली अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- अनैतिक संबंधाच्या कारणावरून सुरभीनगरातील ‘सुरभी टॉवर’मध्ये रिक्षाचालकाचा खून झाला. ही घटना रविवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. बाजारपेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी एका संशयित महिलेला ताब्यात घेतले आहे.

सुरभीनगरातील सुरभी टॉवरमध्ये दुसर्‍या मजल्यावर जया पहलाज नागदेव (वय 38) या महिलेने रविवारी दुपारी 12. 30 वाजता आरडाओरड केली. परिसरातील युवकांनी या महिलेच्या घराकडे धाव घेतली असता घरात संजय देवराम पवार (वय 42, रा. रमाबाई आंबेडकरनगर, भुसावळ) हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. या भागातील रहिवासी प्रमोद सावकारे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते, उपनिरीक्षक निता कायटे, आनंदसिंग पाटील, रमेश चौधरी, विनोद सपकाळे यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी संजय पवार याला डॉ. राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात हलवले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृताची पत्नी उषा संजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुरावा नष्टचा प्रयत्न
पोलिसांनी आरोपी जया नागदेव या महिलेस अटक केली. संजय पवार यांच्या छातीवर वार करून तिने सुरी पाण्याने धुवून घरात ठेवलेली होती. रक्ताचे डाग कापूस व ओल्या कपड्याने पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले.