आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी पर्वात 488 चारचाकींची विक्री, ऑटोमोबाइल क्षेत्रात 38 कोटींची झाली उलाढाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दीपोत्सवात सर्वच क्षेत्रात कोट्यवधींची उलाढाल झाली असून ऑटोमोबाइल सेक्टरसाठी यंदाची दिवाळी फायदेशीर ठरली आहे. या उत्सवात शहरात 488 चारचाकी गाड्यांची विक्री झाली. त्यातून 38 कोटींची उलाढाल झाली.

ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मंदी असल्याने सर्वच कंपन्यांचे लक्ष दीपोत्सवाकडे लागून होते. यंदा दसर्‍याला सर्वसाधारण उलाढाल झाली होती; मात्र दिवाळीच्या काही दिवस अगोदरपासून वाहनांच्या पसंतीसाठी ग्राहकांची लगबग सुरू होती. कंपन्यांनीही ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन विविध नवीन मॉडेल्स दिवाळीपूर्वी बाजारात आणल्यामुळे नागरिकांनी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधण्यासाठी अगोदरपासून वाहनांची बुकिंग केल्यामुळे दिवाळीच्या पर्वात शहरात 488 चारचाकी गाड्यांची विक्री झाली.

नवीन मॉडेलला पसंती

टाटाची व्हेस्टा, सफारी ट्रोम, मारुतीची डिलक्स, फॅशन स्प्रो, स्पीड, अल्टो 801, हॅगनआर, स्वीप्ट डिझायर, आयटेनची नवीन ग्रॅण्ड व इऑन, सॅडॉन व इतर चारचाकी गाड्यांची मागणी होती. गेल्या वर्षापेक्षा यंदा दिवाळीत चांगली उलाढाल झाल्याचे विविध कंपन्यांचे टार्गेट पूर्ण झाल्याचे जाणकारांनी सांगितले.

दिवाळी लाभकारक

दिवाळीत मंदीचा फटका बसला नसला तरी यापुढील काळात परिस्थिती कशी असेल? हे सांगता येणार नाही. पण गेल्या वर्षापेक्षा यंदाची दिवाळी ऑटोमोबाइल सेक्टरसाठी लाभकारक ठरली, असे सोहम मोटार्सचे प्रदीप गिरासे यांनी सांगितले.