आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पावसाची दुसऱ्या दिवशीही हजेरी, ढगाळ वातावरणाचा आरोग्यावर होतोय परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातगुरुवारी रात्री काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशीदेखील हा पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा िनर्माण झाला आहे. अचानक बदललेल्या या वातावरणाचा आरोग्यावरही विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. सकाळपासून काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दिवसभर ढगाळ वातावरण िनर्माण झाले होते.

शुक्रवारी सकाळपासूनच शहरात पावसाच्या शिडकाव्याला सुरुवात झाली. ढगांमुळे काळोख दाटल्याने दमदार पाऊस होण्याची शक्यताही निर्माण झाली होती. या वातावरणाचा बाजारपेठेवर परिणाम दिसून आला. दिवसभर शहरात ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा सुरूच होता. दक्षिण तामिळनाडूची किनारपट्टी श्रीलंकेजवळील समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र विरले असले, तरी लक्षद्वीपपासून दक्षिण गुजरातपर्यंत निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने जळगाव जिल्‍ह्यात त्याचा प्रभाव जाणवत असल्याचे निरीक्षण पुणे हवामान वेधशाळेने नोंदवले आहे. ढगाळ वातावरणामुळे शुक्रवारी जळगावचे कमाल तापमान २३ तर किमान १८.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले.

रुग्णांच्यासंख्येत झाली वाढ : आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर आलेल्या वादळामुळे गेल्या महिन्यातही वातावरण ढगाळ झाले होते. या आठवड्यात पुन्हा वातावरण बदलले असून ढगाळ वातावरण आणि पाऊस याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. यामुळे व्हायरल फिव्हरच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

थंडीचीप्रतीक्षा : नोव्हेंबरमध्येकडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा असताना नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा संपला, तरीही हवी तशी थंडी पडलेली नाही. दिवसा उन्हाचा चटका तर कधी ढगाळ वातावरणामुळे तापमान कमी असूनही उकाडा असल्याचा अनुभव येतोय.

पाणी उकळून प्यावे
ढगाळवातावरण आणि पावसामुळे साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पाणी उकळून प्यावे, हा नियम सर्वांनीच पाळावा. बाहेरचे अन्न टाळून घरातील ताजे अन्न खावे. विशेषत: पाणी भरपूर प्यावे. प्राथमिक बाबींवर नागरिकांनी भर द्यायला हवा. डॉ.गिरीश सहस्त्रबुद्धे, फिजिशियन