आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मु‌ख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात भाजपच्या नगरसेवकांना टाळल्याने असंताेष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- विधानसभा निवडणुकीपासून भाजपचे नगरसेवक असो की शहराचे, पदाधिकारी यांच्यात एकसूत्रता नसल्याचे उघड आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे ऐनवेळी डावलल्याने असंतोषाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे भाजपांतर्गत दुफळी पुन्हा झाल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यादाच जिल्हा दौऱ्यावर येणार म्हटल्यावर प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यात जळगाव शहर आज ज्या परिस्थितीतून जात आहे. त्यासाठी तर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. परंतु मुख्यमंत्र्यांच्या स्वागतापासूनच भाजपतील गटातटाच्या राजकारणावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.
भाजपच्या शहर कार्यकारिणीतील अनेक पदाधिकाऱ्यांना तसेच पालिकेतील बऱ्याच नगरसेवकांना निराेपही दिला नाही. तर काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांतर्फे मिळणाऱ्या पासच्या यादीतूनही नावे वगळल्याचे सांगितले जात आहे. परंतु एेनवेळी जलसंपदा विभागाच्या कोट्यातून या पदाधिकाऱ्यांची ‘एन्ट्री’झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास हजेरी लावली. नेत्यांपासून लांब ठेवण्यासाठीच सर्व खटाटोप असल्याचेही आता दबक्या आवाजात बोलले जात आहे.
नगरसेवकांच्या एकीचे ‘फळ’
भाजपच्या सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे विकास कामांसाठी १०० कोटींची मागणी केली. नगरसेवकांनी मांडलेली भूमिका पटल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी तातडीने २५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली, हे सर्व काही नगरसेवकांनी एकत्रित येऊन केलेल्या प्रयत्नांमुळे शक्य झाल्याचे सांगितले जात आहे. या निधीतून शहरातील रस्ते, गटारी, संरक्षक भिंती, पाणीपुरवठ्याची कामे होतील.
बातम्या आणखी आहेत...