आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कॅशलेस’बाबत जनजागृती करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना पुरस्कार जाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने ‘कॅशलेस सोसायटी’ निर्माण करण्यासाठी जनजागृती करणाऱ्या अाठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रोख ५०० रुपये, स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
 
केंद्र महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्य रोकडरहित व्हावे, या धाेरणाच्या अनुषंगाने राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये यामधील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, समन्वयक, स्वयंसेवकांना या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालये परिसंस्थांमधील रासेयाेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘रोकडरहित महाराष्ट्र’ची विद्यापीठस्तरीय ‘सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक’ पुरस्कार योजना राबवण्यात आली. विद्यापीठातर्फे ‘रोकडरहित महाराष्ट्र’ धोरण राबवण्यासाठी रासेयो स्वयंसेवकांनी केलेल्या कामाच्या आधारावर त्यांचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. यात शहरी भागातील सहा, तर ग्रामीण भागातील दोन विद्यार्थ्यांना ‘रोकडरहित महाराष्ट्र’चे विद्यापीठस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
हे आहेत पुरस्कार विजेते विद्यार्थी
शहरी भाग : रणजितसिंग राजपूत (डी. एन. भोळे महाविद्यालय, भुसावळ), राजनंदिनी भदाणे (एसएसव्हीपीएसचे डॉ. पी. आर. घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे), योगिता गिरासे (पीएसजीव्हीपीएसचे कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, शहादा), कुणाल मानकर गौरव कोळी (धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर) आकाश धनगर (ज.जि.म.वि.प्र.सह. समाजाचे कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, जळगाव).

ग्रामीण भाग : मयूर चव्हाण आणि महावीर वाघ (उत्तमराव पाटील कला विज्ञान महाविद्यालय, दहिवेल, ता.साक्री).
 
बातम्या आणखी आहेत...