जळगाव- गोठवलेली बँक खाती उघडण्यात आल्याने प्रशासनाने अत्यावश्यक सुविधांसाठी गुरुवारी १७ कोटी २० लाख रुपये खर्च केले. पालिका कर्मचा-यांना पगाराची रक्कम अलाहाबाद अॅक्सिस बँकांमध्ये टाकण्यात आल्याने पगार काढण्यासाठी एटीएमबाहेर रांगा लागल्या होत्या. घटस्थापनेच्या दिवशी कर्मचा-यांच्या हाती लक्ष्मी पडल्याने उत्साहाचे वातावरण होते.
दोन महिन्यांपासून वेतनाची रक्कम मिळाली नसल्याने प्रचंड आर्थिक अडचणीत असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना गुरुवारी दिलासा मिळाला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत जागून आस्थापना अकाउंट विभागाने संबंधित बँकांना द्यावयाचे धनादेश तयार करण्यात येऊन गुरुवारी सकाळी संबंधित बँकांना रवाना केले होते. अलाहाबाद बँकेत पेन्शनची रक्कम पडताच कर्मचाऱ्यांनी याठिकाणी गर्दी केली होती. अॅक्सिस बँकेत बहुतांश कर्मचा-यांचे पगार असल्याने याठिकाणी चेक देऊनही सायंकाळी वाजेपर्यंत पगार खात्यात जमा झालेले नव्हते. दिवसभर पगारासाठी कर्मचा-यांचे तगमग सुरू होती. रात्री वाजेनंतर खात्यात पैसे जमा होणार असल्याची चर्चा असल्याने एसएमएसची वाट पाहून पैसे काढण्यासाठी बँकांच्या एटीएम केंद्राबाहेर गर्दी केली होती.
प्रशासनाने पगारासाठी काटी ९४ लाख ५२ हजार, पेन्शनसाठी कोटी ५० लाख, शिक्षण मंडळासाठी कोटी ६२ लाख, एलआयसीचे ६५ लाख ८२ हजार, हुडको कोटी , जेडीसीसी कोटी, क्रॉम्प्टन कोटी २१ लाख ४८ हजार, टेलिफोन बिल लाख ३३ हजार, डिझेलचे २४ लाख ७९ हजार, वाहन विम्याचे ५३ हजार, असे एकूण १७ कोटी २० लाख रुपये वाटप केले.