आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयाेध्यानगरमधील ४० अतिक्रमणांवर जेसीबी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अयाेध्यानगरातील अतिक्रमण जेसीबीने काढताना महापािलकेचे कर्मचारी.)
जळगाव- अयोध्यानगरातील डीपी रस्त्यावर सुमारे ४० घरमालकांनी अतिक्रमण करून बांधकाम केल्याने गटारी बांधण्यास अडथळे निर्माण होत होते. हे अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा महापालिकेच्या नगररचना विभागातर्फे देण्यात आल्या होत्या. परंतु नागरिकांनी या नोटिसांकडे दुर्लक्ष केल्याने अखेर नगररचना विभागाने या अतिक्रमणांवर शनिवारी जेसीबी चालवले.

भुसावळ महामार्गालगतच्या अयोध्यानगरापासून डीपी रस्त्याला सुरुवात होते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारींचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र सुमारे ४० घरमालकांनी रस्त्यावरच अतिक्रमण केल्याने अडथळे निर्माण झाल्याने नगररचना विभागातर्फे संबंधितांना एप्रिलमध्ये स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा दिल्या होत्या.

परंतु या नोटिशींकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे नगररचना विभागाने शनिवारी दुपारी १२ वाजेपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. एक जेसीबीसह नगररचना विभागाचे व्ही.ओ.सोनवणी, बांधकाम विभागाचे दिनेश चौधरी, अविनाश कोल्हे यांच्यासह ते १० मजुरांनी अतिक्रमण काढले.

पालिका असताना ११ सप्टेंबर १९८७मध्ये हद्दवाढ झाली. त्यात काही घरांचे लेआऊट हे त्यापूर्वीचे तसेच डीपी रस्ता मंजुरीपूर्वीचे होते. त्यामुळे हा रस्ता मीटर मंजूर होता. तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दीड मीटर असा १२ मीटरचा रस्ता आहे.
असा आहे डीपी रस्ता
असे होते अतिक्रमण
घरमालकांनीमंजुरीपेक्षा जास्त बांधकाम करून दुकाने, संरक्षक भिंत, ओटे, गॅलरी काढून बांधकाम केले होते. तसेच वृक्ष लागवड करून अतिक्रमण केले होते. हे सर्व अतिक्रमण काढले.
१२००मीटर गटार
याडीपी रस्त्यावर दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ६०० मीटर पक्क्या गटारींचे बांधकाम करण्यात येत आहे. गटार बांधकाम करताना अडथळे येत असल्याने या अतिक्रमणावर जेसीबी चालवावे लागले.
डीपी रस्त्यावरील काढण्यात अालेले अतिक्रमण