आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बी-फार्मसीच्या ‘सीईटी’मध्ये आधार कार्डसाठी अडवणूक आयएमआर महाविद्यालयातील प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बी-फार्मसीच्याप्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटी रविवारी घेण्यात आली. यात मूळ आधार कार्ड नसल्याच्या कारणावरून अाठ ते १० विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार आयएमआर महाविद्यालयातील केंद्रावर घडला.
तंत्रशिक्षण विभागांतर्गत शनिवारी अायएमअार केंद्रावर सीईटी झाली. रविवारीही दुपारी ते वाजता ऑनलाइन परीक्षा घेण्यात अाली. यात जिल्ह्यातील सात औषधी महाविद्यालयांमधील सुमारे एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. आयएमआर, मू. जे. महािवद्यालयासह रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी बारावीचे ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, परीक्षेचे ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले होते. यात इंटरनेटवरून डाऊनलोड केलेले आधार कार्डही ग्राह्य धरले जाणार होते.
केंद्र प्रमुखांना निवेदन : आयएमआर परीक्षा केंद्रावर अंकिता मोतिराम गांवडे, मयूरी शरद पाटील, अर्चना युवराज कोळी, श्रद्धा अशोक खेडकर यासह अन्य काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्डशिवाय अन्य ओळखपत्र होते. परंतु, या वेळी आधार कार्डची सक्ती करण्यात अाली. यातील काही विद्यार्थ्यांनी तत्काळ इंटरनेटवरून आधार कार्ड डाऊनलोड केले. यादरम्यान, परीक्षेस प्रारंभ झाला.
मात्र, पर्यवेक्षकांनी त्यांना मूळ आधार कार्डची सक्ती करून परीक्षेस बसू दिले नाही. त्यामुळे या परीक्षा केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांच्या पालकांनी या वेळी संताप व्यक्त करत केंद्रप्रमुखांना यासंबंधीचे निवेदन दिले.

फोटो - परीक्षेला बसू दिल्यामुळे शिक्षक अधिकाऱ्यांकडे तक्रार करताना विद्यार्थ्यांसमवेत पालक