आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात चिमुरडीची हत्या करून आईची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सात महिन्यांच्या चिमुरडीचे डोके खांबावर आदळून हत्या केल्यानंतर आईने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना जळगाव येथे शनिवारी घडली. लता नारायण गवळी (23) असे मृत महिलेचे नाव असून तिचे औरंगाबाद माहेर आहे. शनिवारी लता मुलीला घेऊन जळगाव येथील असोदा रेल्वेगेटवर पोहोचली. त्यानंतर तिने मुलीचे डोके रेल्वे रुळावरील खांबावर आपटले. यात ती जागीच ठार झाली. त्यानंतर लता रुळाच्या मधोमध उभी राहिली. याच वेळी समोरून येणाºया रेल्वेचालकाने तिला बाजूला करून रेल्वे समोर नेली. काही वेळातच तिने पुन्हा रेल्वेखाली उडी घेतली. यात तिचा पाय कापला गेला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.