आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बढे पतसंस्था अवसायनात; संचालक मंडळ बरखास्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अनागोंदी कारभार आणि राज्यभरातील सुमारे 60 हजार ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यास असर्मथ ठरलेली चंद्रकांत हरी बढे सहकारी पतसंस्था अवसायनात काढण्याचा अंतरिम आदेश राज्याचे सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांनी सोमवारी काढला. या आदेशांतर्गतच संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आल्याचे सहकार विभागाने म्हटले आहे.

अनागोंदी कारभार व नियमबाहय़ कर्जवाटपामुळे राज्यभरातील ठेवीदारांच्या 200 कोटींच्या ठेवी बढे पतसंस्थेत अडकल्या आहेत. संबंधितांना या ठेवी परत करण्यासाठी सहकार विभागाने वारंवार सक्त सूचना देऊनही त्याकडे संचालकांनी दुर्लक्ष केले. तसेच वसुली करताना बेकायदा मॅचिंगचे व्यवहार करून भ्रष्टाचाराला खतपाणी घातले होते.

या पतसंस्थेच्या राज्यात ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण, औरंगाबाद, धुळे, जळगाव व बुलडाण्यासह 78 शाखा आहेत. नियमबाहय़ कर्जवाटप केल्याप्रकरणी संस्थेचे संस्थापक चंद्रकांत बढे, माजी अध्यक्ष व संचालकांसह 42 जणांवर जिल्हा उपनिबंधकांनी कर्जाची जबाबदारी निश्चित केली असून, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हेही दाखल आहेत.