आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bag Stolen In Railway, Careless Police Passiveness

रेल्वेत बॅग लांबवली; बेफिकीर पोलिसांमुळे चोरटे निसटले !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - हावडा एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी सकाळी धरणगाव ते जळगाव प्रवासादरम्यान चाेरट्यांनी एका प्रवाशाला मारहाण करत त्यांची बॅग आणि टॅब लंपास केला. हे पाहून सहप्रवाशांनी चाेरट्यांचा पाठलाग करून त्यांना जळगावात पकडून अाणले. त्यानंतर प्रवासी चाेरट्यांना जळगाव रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात देण्यासाठी कार्यालयात गेल्यानंतर तेथील जवानांनी मदत करता उलट तक्रारदाराची टिंगल उडवली. याचदरम्यान चाेरटे पळून जाण्यास यशस्वी झाले. पोलिसांच्या या निष्काळजीपणामुळे संताप व्यक्त केला जात अाहे.

धरणगाव येथील शशिकांत रघुनाथ येवले (वय ४०) हे दररोज धरणगाव- जळगाव अप-डाऊन करतात. येवले शुक्रवारी सकाळी ९.४५ वाजता हावडा एक्स्प्रेसने जळगावात येत होते. जनरल बोगीत जास्त गर्दी असल्यामुळे ते दरवाजाजवळ उभे हाेते. तेथे चार हिंदी भाषीक मुलांच्या टोळक्याने त्यांना धक्काबुक्की केली. त्याला येवले यांनी विराेध केला म्हणून दोघांनी त्यांना मारहाण केली. तर इतर दोघांनी येवलेंच्या हातातील बॅग टॅब हिसकावून पळ काढला. हा प्रकार सहप्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दोन चाेरट्यांना पकडून ठेवले. त्यांना चावलखेडा स्टेशनवर उतरवून स्टेशन मास्तरकडे नेले असता, त्यांनी त्या चाेरट्यांना जळगावात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्या चाेरट्यांना येवले घेऊन जात असताना रेल्वेगाडी सुरू झाल्याचे पाहून दाेघा चाेरट्यांनी त्यांच्या हाताला झटका देत आरक्षित डब्यांमध्ये प्रवेश केला. त्यांचा पाठलाग करीत येवलेंनीही आरक्षित डब्यात प्रवेश केला. येवलेंपासून बचाव करीत दोघे भामटे थेट पेंट्रिकारमध्ये घुसून लपून बसले. येवलेंनी पिच्छा सोडला नाही. अखेर पेंट्रिकारमधून भामट्यांना शोधून काढले. त्यांना पुन्हा ताब्यात घेऊन जळगावपर्यंत आणले. जळगाव रेल्वे स्थानकावर येवले यांनी चाेरट्यांना दोन विद्यार्थ्यांकडे सोपवून ते रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात गेले. तेथे हयात खान कांबळे हे दोन कर्मचारी रायफल साफ करीत होते. येवलेंनी त्यांच्याजवळ कैफियत मांडली असता, पोलिसांनी मदत करायचे सोडून उलट येवले यांची टिंगल घेतली. ‘येथे रायफल साफ करण्याचे काम सुरू आहे, गोळी लागू शकते तेंव्हा येथून निघून जा,’ असा मस्करीचा सल्ला कांबळे खान यांनी येवलेंना दिला. हा प्रकार पाहून येवले तेथून बाहेर पडले. तोपर्यंत चाेरटे गेंदालाल मिलच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले हाेते. याप्रकरणी येवले यांनी त्या चाेरट्यांची शासकीय रेल्वे पोलिस दूरक्षेत्र चौकीत तक्रार दिली अाहे. या तक्रारीत खान कांबळे यांनी मदत केली नसल्याचा उल्लेख केला अाहे.

गेल्या महिन्यातील घटनेची पुनरावृत्ती
मार्चमहिन्यांत अमळनेर-जळगाव रेल्वे प्रवासात अमळनेरच्या २२ वर्षीय मुलाजवळील टॅब हिसकावून त्या मुलाला धावत्या रेल्वेतून फेकून दिल्याची घटना घडली हाेती. या वेळीही अमळनेरच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी मुलाची भेट घेऊन त्याला गुन्हा मागे घेण्याचे सांगितले होते. रेल्वेत दररोज गुन्हे घडत असतात. पण पाेिलस याकडे लक्ष देत नसल्याने चोरट्यांना हे वातावरण पाेषक झाले अाहे.

पाेलिसांनी मदत केली नाही
माझ्यावस्तू चोरीस गेल्यानंतर मी चोरट्यांना पकडून आणले होते. तरीही रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी मदत केली नाही. त्यांच्यामुळे चोरटे पळून गेले. - शशिकांतयेवले, तक्रारदार

ही घटना शासकीय रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने तक्रारदाराला त्यांच्याकडे पाठवले. चोरटे पळून जाण्यात आमच्या कर्मचाऱ्यांचा दोष नाही. -गोकूळे सोनुनी, पोलिस निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल
पुढे पाहा घटनाक्रम