आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणाबाई चाैधरींची जीवन कहाणी प्रथमच ब्रेल लिपीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - निसर्ग कन्या,खान्देशकन्या म्हणून ज्यांना अापण अाेळखताे अशा कवयित्री बहिणाबाई चाैधरी यांचा परिचय प्रथमच अंध मुलांना ब्रेल लिपीतून होणार आहे. याकरिता डाॅ. प्रमिला भिरूड लिखित ‘बहिणाअीची जीवन कहाणी’ या मूळ पुस्तकाचे ब्रेल लिपीत रूपांतर प्रथमच चाळीसगाव येथील राष्ट्रीय अंध शाळेतील विशेष शिक्षक सचिन साेनवणे यांनी केले अाहे. या पुस्तकाचे प्रकाशन साेमवारी चाळीसगाव येथील राष्ट्रीय अंध विद्यालयात सकाळी ११ वाजता संस्थेचे पदाधिकारी प्रा.डाॅ. किसन पाटील यांच्या हस्ते हाेणार अाहे.
भिरूडयांचे माेठे साहित्य
डाॅ.प्रमिला भिरूड या अाज ७८ वर्षांच्या असून अातापर्यंत त्यांची एकूण १३ पुस्तके प्रकाशित असून बहिणाई यांच्या जीवनावर अाधारित पुस्तके अाहेत. त्यांचे १४वे पुस्तक “बहिणाबाईंचा पाेवाडा’ हे पुढील महिन्यात प्रकाशित हाेईल. त्यांनी “बहिणाईंची गाणी एक अभ्यास’, “मी बहिणाई’ हे आत्मचरित्र ग्रामीण बोलीभाषेतून तसेच सीडीदेखील स्वत:च्या अावाजात, ‘बहिणाईंची कविता एक अध्ययन’ हिंदी भाषांतर या पुस्तकांचा समावेश अाहे. १९८२मध्ये त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली असून, त्या मू.जे.महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे कार्यरत हाेत्या.

बहिणाबाई चौधरी यांची पुस्तके अनेक पुस्तकांचे रूपांतर
सचिन साेनवणे यांनी चाळीसगाव येथील राष्ट्रीय अंध शाळेतील ५५ मुलांसाठी ‘बटाट्याची चाळ’ हे भागांत, अब्राहम लिंकन यांचे पत्र, कुसुमाग्रजांच्या कविता, तिरुपती बालाजीचा इतिहास, विज्ञान, भाैगाेलिक, गणितीय असे १५ प्रकल्पांसह दिनदर्शिका तयार केली अाहे. अाता त्यांनी ‘बहिणाईंची जीवन कहाणी’ हे पुस्तक ब्रेल लिपीत रूपांतर केले. यासाठी त्यांना महिन्यांचा कालावधी लागला आहे.

अंध मुलांनाही कळावे
^मी अगाेदर पुस्तके वाचल्यावर प्रभावित झालाे, तसेच अापण खान्देशात राहून जर मुलांना बहिणाबाई यांच्याबद्दल नाही सांगितले तर काय उपयाेग अाहे, असेही वाटले याकरिता मी हा निर्णय घेतला. बहिणाबाई यांची अाेळख मुलांना व्हावी हाच या मागचा उद्देश आहे. सचिनसाेनवणे, विशेष शिक्षक, राष्ट्रीय अंध विद्यालय, चाळीसगाव

बहिणाईंची अाेळख व्हावी
^बहिणाबाई यांची सर्व समाजाला अाेळख व्हावी, हाच ध्यास मी मनात धरला अाहे. त्यांच्या विषयी डाेळस लाेकांना वाचायला मिळते; तसेच अंध मुलांनाही त्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने ब्रेल लिपीत पुस्तक काढण्याचे साेनवणे यांनी ठरवले, हाच माझ्यासाठी खूप माेठा विषय असल्याचे मी समजते. डाॅ.प्रमिला भिरूड
बातम्या आणखी आहेत...