आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणाबाई उद्यानाजवळील चौक अन् रस्ता सुशोभिकरणाचा शुभारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसहभागातून शहराचा विकास करण्याच्या महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देत माहेश्वरी समाजातर्फे बहिणाबाई उद्यानाजवळील चौक या मार्गावरील दुभाजकाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे - Divya Marathi
लोकसहभागातून शहराचा विकास करण्याच्या महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देत माहेश्वरी समाजातर्फे बहिणाबाई उद्यानाजवळील चौक या मार्गावरील दुभाजकाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे
जळगाव- लोकसहभागातून शहराचा विकास करण्याच्या महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देत माहेश्वरी समाजातर्फे बहिणाबाई उद्यानाजवळील चौक या मार्गावरील दुभाजकाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ सोमवारी महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष मनीष झंवर यांच्याहस्ते करण्यात आले. या चौकास ‘महेश चौक’ आणि रस्त्यास ‘महेश मार्ग’ असे नाव देण्यात येणार आहे. त्याबाबतचा ठराव मनपाच्या महासभेत झाला आहे. 
 
या वेळी नगरसेविका अॅड. शुचिता हाडा, दीपमाला काळे, नगरसेवक कैलास सोनवणे, राधेश्याम कोगटा, माहेश्वरी सभेचे प्रदेश सचिव अंजनीकुमार मुंदडा, बाळकृष्ण बेहेडे, संजय बिर्ला, रवींद्र लढ्ढा, तेजस देपुरा, जगदीश जाखेटे, हरीश मुंदडा, प्रदीप मणियार, दिलीप दहाड, राधेश्याम बजाज, सचिव तुषार तोतला, मनीष बाहेती, कैलास मालू, प्रा. संजय दहाड, वास्तुविशारद नीरज मंत्री, संजय दहाड, अशोक राठी, अॅड. राहुल झंवर, विनय बाहेती, योगेश कलंत्री, अॅड. सुरेंद्र काबरा, रमण लाहोटी, लोकेश राठी, विनोद मुंदडा, वासुदेव बेहेडे, निशिकांत मंडोरा आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. राजेंद्र माहेश्वरी यांनी केले. 
 
महेश स्तंभ, दिशादर्शक फलक, शोभिवंत झाडे या कामात महामार्गापासून ते जिल्हापेठ पोलिस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बहिणाबाई उद्यानालगतच्या चौकाचे सुशोभिकरण केले जाणार आहे. त्यात महेश स्तंभ, पाथवे, नागरिकांना बसण्यासाठी बाक, स्वागत कमान, झेब्रा क्रॉसिंग, चौकात हायमास्ट लॅम्प यांचा समावेश आहे. 
 
दुभाजकाची रंगरंगोटी करणार 
बहिणाबाई उद्यानापासून ते पिंप्राळा रेल्वे गेटपर्यंतच्या दुभाजकाची रंगरंगोटी केली जाणार असून, त्यामध्ये शोभिवंत झाडे आणि दिशादर्शक फलक लावले जातील. या कामाचे लोकार्पण १ जून रोजी अखिल भारतीय माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्याम सोनी, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्याहस्ते स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. 
भूमिपूजन करताना आमदार सुरेश भोळे. समवेत आमदार चंदुलाल पटेल, महापौर नितीन लढ्ढा आदी. 
बातम्या आणखी आहेत...