आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणाबाईंचे स्मारक पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे त्यांच्या माहेरातच स्मारक व्हावे, अशी गावकऱ्यांची एका तपापासूनची इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी उदासीन शासनाकडून उशिरा का होईना प्रयत्न करण्यात आले. मात्र, हे प्रयत्न ताेकडे ठरले आहेत. कारण प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होऊन तीन वर्षे उलटली तरी, आसोदा येथील त्यांच्या स्मारकाला पूर्ण होण्याची प्रतीक्षा कायम आहे.
बहिणाबाई चौधरी यांच्या कविता सातासमुद्रापार पोहोचल्या. या कविता व आठवणी कायम संग्रही राहाव्यात म्हणून त्यांच्या गावात स्मारक उभारावे, या मागणीसाठी अनेक आंदोलने करण्यात आली. त्यानंतर मागणी मान्य झाली. तसेच निधीची मंजुरी, नविदिाप्रक्रिया आदी अडथळे पार होऊन यंदा प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. मात्र, आजपर्यंत या स्मारकाचे केवळ २० टक्के काम पूर्ण झाले आहे. १ हेक्टर १६ आर जागेत स्मारकासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून ४ कोटी ९५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत उभारणीचे काम सुरू आहे. या स्मारकाच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले असून, दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याची मुदत बांधकाम ठेकेदारास देण्यात आलेली आहे. बहिणाबाई स्मारक विकास मंचचे सदस्य पाठपुराव्यासह या कामाला गती मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे.
माहेरातील वाड्यातच होते प्रतिमापूजन
आसाेद्यातील चौधरीवाड्यातच छोटेखानी जयंती व पुण्यतिथीस प्रतिमापूजन केले जाते. त्यामुळे या स्मारकाच्या कामास गती मिळून पुढील वर्षी गावातच बहिणाबाईंच्या जयंतीचा कार्यक्रम होईल, अशी अपेक्षा आहे.