जळगाव - खान्देशातीलसांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेला बालगंधर्व महोत्सवात यंदा स्त्रीशक्तीचा आविष्कार पाहायला मिळणार आहे.
स्त्रियांमधील विविध रुपांप्रमाणेच येथेही संगीत, नृत्य, वादनातील अदाकारींचा सुरेल संगम अनुभवायला मिळणार आहे. स्व. वसंतराव चांदोरकर स्मृतीप्रतिष्ठानतर्फे आयोजित १३व्या बालगंधर्व महोत्सवाचे आयोजन ते ११ जानेवारीदरम्यान बालगंधर्व नाट्यगृहात हा ‘महिला विशेष महोत्सव’ होणार आहे. कलाकार साथ-संगत करणारे कलाकार ह्यादेखील महिलाच असतील.
यांचासमावेश : यंदाहीराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांना प्रतिष्ठानतर्फे बोलावण्यात आले आहे. रोजी उद्घाटन होणार आहे. पहिल्या सत्राची सुरुवात पद्मश्री पंडिता सुमित्रा गुहा (दिल्ली) यांच्या गायनाने होईल. त्या शास्त्रीय, उपशास्त्रीय गायन सादर करतील. त्याचप्रमाणे प्रख्यात भरतनाट्यम् कलावंत गुरू-शिष्य तसेच माय-लेकी असलेल्या पंडिता स्वाती दैठणकर त्यांची कन्या नूपुर दैठणकर या पारंपरिक भरत नाट्यमहोत्सव नाट्य संगीत, मराठी अभंगांचेही सादरीकरण करणार आहे.
बंगलाेर येथील प्रख्यात सतारवादक पंडिता अनुपमा भागवत, न्यूयॉर्क येथील तबलावादक पंडित नितीन मित्ता हे तबल्याची साथसंगत करतील. तर पंडिता अनुराधा पाल यांचा ‘स्त्री-शक्ती आविष्कार’,पंडिता शाश्वती मंडळ पॉल (मुंबई) यांचे शास्त्रीय उपशास्त्रीय गायन तीन पिढ्यांचे एकत्रित व्हायोलिन वादन पद्मभूषण डॉ. एन. राजम यांच्या कन्या डॉ. संगीता शंकर तसेच त्यांच्या दोन नाती रागिणी नंदिनी या चौघी मिळून अर्थात ‘थ्री जनरेशन कॉन्सर्ट’ सादर करणार आहेत. तीन पिढ्यांचे एकत्रित वादनाचा हा प्रयोग खान्देशातील इतिहासात प्रथमच होईल.
आगळा वेगळा प्रयोग
-यंदासंपूर्ण महोत्सवात स्त्रीशक्तीचा आविष्कार पाहायला मिळणार आहे. यात कलावंतापासून ते थेट साथसंगीत करणारे कलावंत यासुध्दा महिलाच असणार आहेत. या आगळ्यावेगळ्या प्रयोगामुळे महिला कलावंतांना प्रोत्साहन मिळेल. या उद्देशाने हा कार्यक्रम आयोिजत करण्यात आला आहे. दीपकचांदोरकर