आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Balabharati Institution,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालभारतीकडून मिळणार शिक्षकांना आनंददायी धडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आता प्राथमिक शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापकांना बालभारती या संस्थेकडून आनंददायी शिक्षणाचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणाच्या हक्कासाठी बालभारतीचा हा प्रयत्‍न असून ऑगस्ट महिन्यापूर्वी प्रत्येक तालुक्यात हा उपक्रम राबवला जाणार हसत खेळत विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आनंद घेता यावा, यासाठी बालभारतीने हा उपक्रम सुरू केला आहे. अभ्यासक्रमात कठीणता वाटू नये, यासाठी नवोपक्रम माध्यमातून कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबरोबरच खासगी प्राथमिक शाळांच्या शिक्षकांसाठी ही कार्यशाळा होईल. यातून विद्यार्थ्याच्या मनाशी थेट संवाद साधत त्याच्या मनातील अभ्यासक्रमाची भीती जाऊन गुणात्मक विद्यार्थी घडण्यास मदत होणार आहे.
अवघड करणार सोपे
सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात. शिक्षणाच्या हक्कासाठी एकही विद्यार्थी वंचित राहता कामा नये. त्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले जाईल. वर्षभर कोणते उपक्रम राबवावेत, एखाद्या विद्यार्थ्याला अवघड वाटणारी बाब सोपी कशी करता येईल. विषयाचे आकलन करण्यासाठी काय प्रयत्‍न करता येतील. यादृष्टीने विचार करून वेगवेगळे कृतीशील उपक्रम राबवावेत. विद्यार्थ्यांची सततची गैरहजेरी शोधत पालकांशी संवाद साधावा. त्याला शाळेची गोडी कशी लागेल, यासाठी प्रयत्‍न करावेत. नवीन कोणते उपक्रम हाती घेता येतील, याबाबत चर्चा होईल. तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी कार्यालयांना कार्यशाळेच्या नियोजनाविषयी उपस्थित बालभारतीच्या प्रतिनिधींना सहकार्य करण्यासाठी आदेश निर्गमित करावेत, अशा सूचना महाराष्ट्र पाठय़पुस्तक मंडळाने शिक्षणाधिकार्‍यांना केल्या आहेत.
माध्यमांसाठी कार्यशाळा
पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळेतील शाळा प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांसाठी मंडळाच्या संशोधन विभागाच्यावतीने अर्धा दिवस तालुकास्तरीय प्रकल्प नवोपक्रम, कृती संशोधन कार्यशाळा होणार असून याच्या नियोजनासंदर्भात संशोधन विभागाचे प्रतिनिधी तालुकास्तरावर संपर्क साधणार आहेत. बालभारतीच्या या उपक्रमाबाबत सर्व माध्यमांच्या शिक्षक, मुख्याध्यापकांमध्ये स्वागत होत आहे.