आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालगंधर्व महाेत्सवात सुरांची मैफल रंगली, कलाक्षेत्रात अनेक संधी : बोरकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : स्व.वसंतराव चांदाेरकर प्रतिष्ठानतर्फे अायाेजित १५ व्या बालगंधर्व संगीत महाेत्सवास गुरुवारी प्रारंभ झाला. या वेळी पहिल्या दिवशी संवादिनीच्या सुरांची मैफील रंगली. 
 
उद्घाटनप्रसंगी युनियन बँकेचे डीजीएम विनायक टेंभुर्णे, स्टेट बँक अाॅफ इंडियाचे एजीएम उदय पानसे, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्रतिष्ठानचे विश्वस्त शरदच्चंद्र छापेकर, सचिव अरविंद देशपांडे, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदाेरकर उपस्थित हाेते. सुरुवात प्रतिष्ठानचे स्थानिक कलाकारांच्या साथीने स्व. वसंतराव चांदाेरकर दिग्दर्शित स्व.शशिकांत राजदेरकर रचित संगीत कथा सांगते, व्यथा सुरांची या नाटकाची नांदी, घे नमन शिवशंकरा विद्याहरण नाटकातील सुखकर हे हाेवाे या दाेन नांद्या सादर करण्यात अाले.
 
 वरुण नेवे, राहुल माळी, तेजस नाईक, संजय कुलकर्णी, स्वानंद देशमुख, मयूर पाटील, अंजली धुमाळ, रश्मी कुरंभट्टी, अनघा नाईक, जुईली कलभंडे, गाैरी कुलकर्णी या कलाकारांनी अापला सहभाग नाेंदवला. संवादिनीवर राजेंद्र माने, तबल्यावर दीपक चांदाेरकर यांनी साथसंगत केली. पंडित बाेरकर यांनी ‘मारुबिहाग’ रागातील बडा ख्याल मध्यलय झपतालात द्रूत बंदिश तीन तालात सादर केली. बालगंधर्व महाेत्सवातील सर्वात ज्येष्ठ कलावंत ते ठरले. त्यानंतर मिश्र पिलू रागातील ठुमरी, भास्करबुवा बखले यांनी संगीतबद्ध केलेले संगीत स्वयंवर नाटकातील नाथ हा माझा हे नाट्यगीत सादर करून दाद मिळवली. 

 
मुलांना पूर्वी पेटी शिकवणे पसंत केले जात नसायचे. नाेकरीला प्राधान्य दिले जायचे. परंतु, अाता मुलांनी एकतरी कला जाेपासायला हवी, असा पालकांचा कल असताे. पालक हे मुलांना स्वत:हून घेऊन येतात. त्यामुळे अाजची पिढी ही चाैफेर असून त्यांना अनेक संधी उपलब्ध झाल्या अाहेत. पूर्वी गुरू मिळत नव्हते, अाजकाल गुरू घरी येऊन शिकवता, हे अाजच्या पिढीचे भाग्य अाहे, असे मत संवादिनी अाॅर्गनवादक पद्मश्री पंडित तुलसीदास बाेरकर यांनी व्यक्त केले. बालगंधर्व महाेत्सवासाठी ते शहरात अाले हाेते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, लहानपणी कीर्तन एेकताना हार्माेनियमचा अावाज एेकला होता. तो आवाज भावल्याने अाकर्षित झालाे. तेव्हापासून हार्माेनियमशी जुळलाे अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...