आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Baloon Dam Build Over Girana River Minister Girish Mahajan

गिरणा नदीवर सात बलून बंधारे बांधणार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची घाेषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यात काेल्हापूर बंधा-यांचा प्रयाेग यशस्वी हाेताना दिसून येत नाही. या बंधा-यांमध्ये टाकण्यात अालेल्या पाट्यांची चाेरी हाेत असल्याने पाणी अडवणे शक्य हाेत नाही. त्यापेक्षा परदेशात वापरण्यात येणारे अद्ययावत बलून बंधारे उभारण्याचा विचार शासन करत अाहे. याचा पायलट प्राेजेक्ट म्हणून गिरणा नदीवर सात ठिकाणी बलून बंधारे उभारण्यात येणार अाहेत, अशी घोषणा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
तापी खाे-यात सद्य:स्थितीत ४६ प्रकल्प अपूर्ण असून यासाठी अाठ हजार काेटींपेक्षा अधिक निधी लागणार अाहे. यातील १५ प्रकल्प जून २०१६पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट अाहे. निम्न तापी प्रकल्प शेळगाव बॅरेज यांचे सुधारित संकल्प चित्र महिनाभरात तयार करण्याचे अादेश दिले अाहेत. यासाठी समिती गठित करण्यात अाली अाहे.