आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘केळी विमा’ची व्याप्ती वाढली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - हवामान अाधारित पीकविमा याेजनेत केळी उत्पादन घेणाऱ्या जिल्ह्यातील नवीन महसूल मंडळांचा समावेश करण्यात अाला अाहे. या मंडळातील शेतकऱ्यांना ११ जानेवारीपर्यंत विमा हप्ता भरण्याची वाढीव मुदत देण्यात अाली अाहे.

नव्याने समावेश केलेल्या मंडळांमध्ये जळगाव तालुक्यात अासाेदा, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे, बाेदवड तालुक्यातील बाेदवड, करंजी, धरणगाव तालुक्यातील साेनवद, पाराेळ्यातील तामसवाडी, बहादरपूर या महसूल मंडळांचा समावेश करण्यात अाला अाहे. या मंडळातील गावांना या विमा याेजनेत सहभागी हाेता येणार अाहे. केळी पिकासाठी सन २०१५-१६ साठी जिल्ह्यातील ७४ महसूल मंडळांचा समावेश करण्यात अाला हाेता.

यात अाणखी मंडळांचा अाता नव्याने समावेश करण्यात अाला अाहे. या मंडळांतर्गत येणाऱ्यांना विमा हप्ता भरण्यासाठी ११ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात अाली अाहे. मंडळांतील ७७ गावांना या निर्णयाचा लाभ हाेणार अाहे. या भागात केळी उत्पादन हाेऊन विम्याचा लाभ मिळत नव्हता. अाता नव्या निर्णयामुळे हा लाभ मिळू शकेल.