आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पट्टी काटे वापरल्यास पाच हजारांचा दंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - केळी भावावरून व्यापारी अाणि शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी संयुक्त बैठक घेण्यात आली. या वेळी शेतकऱ्यांचा संताप पाहता पट्टी काटे वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना यापुढे पाच हजार रुपयांचा दंड तसेच दलाल अाणि विना परवानाधारक व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा बाजार समितीने उचलला आहे. दरम्यान, बैठकीकडे बहुतांश व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत किनोद येथील उपबाजार समितीत पुन्हा बैठक घेण्यात येईल.
कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या बैठकीला बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे, उपसभापती कैलास चाैधरी, संचालक प्रभाकर पवार, प्रभाकर साेनवणे, केळी पणन कृती समितीचे प्रतिनिधी हरीश पाटील यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित हाेते. अनधिकृत, परवाना नसलेल्या व्यापाऱ्यांना केळी कापण्यास मज्जाव विना परवाना केळी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर यापुढे थेट कारवाई केली जाणार आहे. तसेच सर्व व्यापाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक काटे सक्तीचे करण्यात आले आहेत. दरम्यान, केळीचे उत्पादन अधिक असल्याने परवडत नसल्याचे रडगाणे गात व्यापाऱ्यांनी केळी कापणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या अाक्रमक पवित्र्यानंतर बाजार समितीने व्यापाऱ्यांवर कारवाईची भूमिका घेतली.

किनोद येथे भाव निश्चितीसाठी होणार बैठक
रावेर प्रमाणे किनाेद उपबाजार समितीमध्ये केळीचे दरराेजचे भाव काढले जावेत, अशी शेतकऱ्यांनी मागणी अाहे. येत्या दिवसांत किनाेद येथे व्यापाऱ्यांसोबत बैठक घेऊन किनाेद येथेच दररोजचे केळीचे भाव निश्चित केले जाणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...