यावल - केळीची तीन किलो कटती बंद करण्यात आली आहे. तसेच मोजमाप केवळ इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावरच करावे, असा निर्णयही यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे. रावेर बाजार समितीतही यापूर्वी कटती बंद केली होती.
यावल बाजार समितीची बैठक शुक्रवारी झाली. बैठकीस सभापती नितीन चौधरी, उपसभापती भानुदास चोपडे, अतुल पाटील, दिनकर पाटील, बारसू नेहेते उपस्थित होते. बैठकीत कटती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जुने काटे बदलून इलेक्ट्रॉनिक्स काटे करण्याची मुदत २० फेब्रुवारीपर्यंत दिली आहे. मुदतीनंतर समितीचे सचिव वजन मापे निरीक्षक अचानक तपासणी करणार आहेत. यात दोषी आढळणा-यांवर बाजार समिती अधिनियम फौजदारी दंडसंहितेनुसार कारवाई करण्यात येणार आहे.