आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठपुराव्याचा अभाव; पालिकेत ५० कोटी रुपये अखर्चीत निधी धूळ खात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - नाशिक विभागातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका असलेल्या भुसावळ शहराला राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीची कमतरता नाही. मात्र, राजकारणातील कुरघोड्या, इच्छाशक्तीचा अभाव, प्रशासकीय मनुष्यबळाचा अभाव आदी अनेक कारणांमुळे निधी अखर्चित राहण्याचे प्रमाण वाढले.
पालिकांच्या सभांमध्ये त्या वेळी विरोधी गटात असलेल्या भाजप, खाविआच्या नगरसेवकांनी पडून असलेल्या निधीबाबत सभागृहात अनेक वेळा मुद्दा उपस्थित केला. आता निवडणुकीनंतर तत्कालीन विरोधक असलेल्या भाजपची पालिकेवर एकहाती सत्ता आली आहे. यामुळे या अखर्चित निधी विकासात्मक कामांसाठी कशाप्रकारे उपयोगात आणला जातो, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. अखर्चित निधीचा डोंगर कमी होतो की वाढतो? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. कारण एकीकडे शहरात अनेक समस्या वाढल्या आहेत, तर दुसरीकडे पालिकेत सर्व प्रमुख हेडवर निधी शिल्लक आहे. बहुतांश कामांना तर पालिकेच्या अर्थसंकल्पात मंजुरी आहे. मात्र, निधी का खर्च होत नाही? या प्रश्नाचे उत्तर उलगडण्यासारखे आहे. शहरातील रस्ते, गटारी, आरोग्य, दलित वस्त्यांमधील प्रश्न, दलित वस्त्यांना जोडण्यात येणारी कामे, उद्यान विकास, राष्ट्रपुरुषांचे पुतळे आणि स्मारके, अग्निशमन सेवा बळकटीकरण आदींचा निधी शिल्लक असून या क्षेत्रातील अनेक उणीवा दूर करण्यासाठी पालिकेतील भाजपच्या नवनिर्वाचित सत्ताधाऱ्यांना संधी आहे. बहुमत आणि नगराध्यक्षपदाच्या जोरावर आता ही कामे पूर्ण कशी होतील? याबाबत शहरात उत्सुकता आहे.

पाठपुरावा व्हावा
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात शहरातील प्रमुख रस्त्यांवर एलईडी दिवे लावण्यासाठी निविदा काढण्यात आली. मात्र, अकाउंटंट नसल्याने कामे झाली नाहीत. पालिकेच्या अास्थापनेवर अकाउंटंटसह अन्य पदे रिक्त आहेत. यामुळे रिक्त पदांवर मनुष्यबळ कार्यरत करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना प्रयत्न करावे लागतील.

फंडात १२ कोटी
पालिकेच्या फंडात सध्या सुमारे १२ कोटींपर्यंतचा निधी आहे. नोटा बंद झाल्यानंतर कर स्वरुपात जुन्या नोटा स्वीकारल्याने पालिकेला मार्चपूर्वीच ते साडेतीन कोटींचे उत्पन्न मिळाले. मार्च अखेरपर्यंत पुन्हा करवसुली होईल. यामुळे पालिका फंडातील रक्कम वाढेल. या फंडातील रक्कम ऐनवेळी शहरातील किरकोळ कामांसाठी वापरता येणार आहे.

पुतळा दुरुस्तीचे पैसे धूळ खात
राष्ट्रपुरुषआणि थोर व्यक्तींचे पुतळे आणि स्मारकांची उभारणी तसेच डागडुजी या हेडखाली पालिकेच्या खात्यात २१ लाख ५० हजार रुपयांचा निधी अखर्चित आहे. शहरातील गांधी पुतळ्याच्या परिसराची दुरवस्था झाली आहे. तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील पुतळा, शहीद राकेश शिंदे स्मारक आदी स्मारकांचे सुशोभिकरण तसेच डागडुजी करण्यासाठी या निधीचा वापर करता येईल.

नगरोत्थानसाठी कसरत :राज्यभरातीलमुख्याधिकाऱ्यांच्या बैठकीत नगरविकास संचालनालयाने (मुंबई) भुसावळातील नगरोत्थान योजनेला होत असलेल्या विलंबामुळे १६ सप्टेंबरच्या बैठकीत ही योजना रद्द केली होती. यामुळे पालिकेकडे नगरोत्थान योजनेचा कोटी ९८ लाख रुपयांचा निधी असूनही तो अखर्चीत आहे. पालिकेतील भाजपची केंद्र आणि राज्यातही सत्ता आहे. या सत्तेचा वापर करून ही योजना आता पुन्हा राबवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...