आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे जिल्हा बँकेत अागडाेंब, फर्निचरसह सर्व साहित्य खाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - धुळे िजल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीला रविवारी लागलेल्या अागीत बँकेतील सर्व साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे, संगणक जळून खाक झाले. तब्बल सहा तास अागीचे तांडव सुरू हाेते. अग्निशामक दलाच्या जवानांनी १२ बंबांच्या ७५ फेऱ्यांद्वारे अडीच लाख लिटर पाणी वापरून अागीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत सुमारे दीड काेटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अाहे.

रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास बंॅकेच्या ितसऱ्या मजल्यावरील मुख्य कार्यालयातील उत्तरेकडील बाजूच्या िखडकीतून धूर बाहेर येत असल्याचे िवजय व्यायाम शाळेच्या मैदानावर िक्रकेट खेळणारी मुले अाणि शिवाजी राेडवरील काही नागरिकांना बंॅकेतून धूर निघत असल्याचे िदसून अाले. हवेमुळे िखडकीतून अागीचे लाेळ िदसून अाल्याने घटना गंभीर असल्याची लक्षात अाली. अग्निशमन दलाला याची माहिती िदल्यानंतर पंधरा मिनिटांत महापालिका अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, अग्निशमन बंबाच्या गाडीवर उंच शिडी नसल्याने पाण्याचा मारा करण्यात अडचण येत हाेती. परिणामी हवेमुळे काही क्षणात अागीचे स्वरूप वाढले. त्यामुळे दाेन बंबाचे पाणी केवळ वाया गेले. त्यानंतर अाधुनिक यंत्रणा असलेले बंब बाेलावण्यात अाले. त्यांच्याद्वारे अाग िवझविण्याचा प्रयत्न केला गेला. वाहनावरील लांॅचरद्वारे पाणी मारण्यात अाले. मात्र, त्याच वेळी हवेचाही वेग वाढल्याने अागीने सव्वानऊ वाजेच्या सुमारास राैद्ररूप धारण केले. संपूर्ण चाैथा मजला अागीच्या भक्ष्यात सापडला. अागीमुळे या मजल्यावर बाहेरच्या बाजूने लावलेली वातानुकूलित यंत्रणा पेटून खाली पडत हाेती. पुढच्या बाजूला असलेले दहापैकी सहा एसी जळून खाली पडले. तसेच अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या दालनाला लावलेले सहा एसीही या अागीत जळाले. तसेच संपूर्ण दालनेही अागीत खाक झाली.

शाॅर्टसर्किटचे कारण?
ही अाग शाॅर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात अाहे. पहिले चार तास तर वरच्या मजल्यावर चढण्यास काेणतीही संधी नव्हती. अकरा वाजेच्या सुमारास अागीवर काही प्रमाणात नियंत्रण िमळवण्यात यश अाल्याने काही कर्मचारी वरच्या मजल्यावर चढले. तेथे पाइप नेऊन अाग विझविण्याचा प्रयत्न केला. बारा वाजेपर्यंत अाग काही प्रमाणात शांत झाली हाेती. पाच ते सहा तास अाग धगधगत हाेती. अाजूबाजूला अग्निशमन दलाचा बंब जाण्यासाठी जागा नसल्याने अागीवर िनयंत्रण िमळवण्यासाठी अडचणी येत हाेत्या. त्यामुळे काही झाडांच्या फांद्या ताेडून अागीवर पाणी मारण्याचे काम करण्यात अाले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, माेठा धाेका टळला