आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकरमध्ये मौल्यवान वस्तू ठेवा अन् निश्चित व्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरात चोर्‍या, दरोड्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत घरात मौल्यवान वस्तू, दागिने ठेवण्याचा धोका कमी करण्यासाठी नागरिकांना बॅँकेतील लॉकर सुविधेचा पर्याय उपलब्ध आहे. बहुतांश बॅँकांनी ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने अनेक नागरिक मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेबाबत निश्चिंत आहेत. सध्या शहरात विविध बॅँकेचे 1364 लॉकर उपलब्ध आहेत.

घरात मौल्यवान दागिने सांभाळणे आता जिकरीचे झाले आहे. त्यामुळे या वस्तू सांभाळण्यासाठी बॅँकेचे लॉकर हा एकमेव पर्याय उत्तम आहे. शहरात अनेक बॅँकांच्या लॉकरची सोय उपलब्ध आहे. यासाठी ग्राहकाने बॅँकेत बचत खाते उघडणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या निर्देशाप्रमाणे सर्वच बॅँकांचे लॉकर विषय नियम सारखे आहेत. डिपॉझिट संदर्भात मात्र, काहीसा फरक आहे. बॅँकेच्या लॉकरमध्ये मोैल्यवान वस्तू आणि दागिन्यांबाबत बॅँकेकडून गोपनियतेची हमी दिली जाते. लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंची माहिती देण्याची ग्राहकांना गरज नाही. लॉकरचे वार्षिक भाडे देण्याची हमी देण्यासाठी दोन वर्षाच्या भाड्याइतके डिपॉझिट घेतले जाते. काही बॅँक या डिपॉझिटच्या व्याजातून वार्षिक भाडे आकारतात. कागदपत्रांची पुर्तता केल्यास नागरिकांना ही सुविधा दिली जाते. स्टेट बॅँकेच्या मुख्य शाखेकडे एकूण 840 लॉकर उपलब्ध आहेत. लहान लॉकर 1019 रुपयांपासून तर मोठय़ा लॉकरसाठी 5093 रुपये वार्षिक भाडे आकारले जाते. पीपल्स बॅँकेत आठ प्रकारचे 5770 लॉकर आहेत. यात 400 रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यत वार्षिक भाडे आकारले जाते. जळगाव जनता बॅँकेत तीन प्रकारचे 5293 लॉकर उपलब्ध आहेत.