आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाहाकार : । 25 कोटींचे पॅकेज घेऊन परतफेड नाही; पतसंस्थांच्या अडचणीत वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शासनाकडून 200 कोटी रुपयांचे पॅकेज घेऊन त्याची मुदतीत परतफेड न करणा-या पतसंस्थांच्या मालमत्तांवर बोजा बसवणार आहे. भुसावळ शहरासह तालुक्यातील 21 पतसंस्थांनी 34 हजार 51 ठेवीदारांसाठी पॅकेजमधून 25 कोटी 82 लाख 87 हजार 151 रुपये मदत घेतली होती. यात फक्त तीन संस्थांनी परतफेड केली.

मुदत संपूनही ठेवींच्या रकमा परत न मिळाल्याने ठेवीदार आणि पतसंस्था चालकांमध्ये संघर्ष निर्माण झाला. यामध्ये हस्तक्षेप करीत शासनाने ठेवीदारांसाठी पतसंस्थांना 200 कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. झालेल्या कर्ज वसुलीतून ही रक्कम पतसंस्थांनी शासनाला परत देणे अपेक्षित होते. मात्र, पॅकेज घेण्यासाठी पुढे असलेल्या पतसंस्था कर्जाची परतफेड करताना हात आखडता घेत आहेत. यासाठी पुन्हा एकदा कर्ज वसुली होत नसल्याचे जुनेच कारण पुढे करण्यात आले. मात्र, पॅकेजची परतफेड न करणा-या पतसंस्थांच्या मालमत्तेवर बोजा बसवण्याच्या हालचाली सुरू आहेत. यासाठी सहकार विभागाने महसूलच्या सहकार्याने पतसंस्थांच्या मालमत्तेच्या माहिती आणि उता-यांचे संकलन सुरू केले आहे. लवकरच या मालमत्तांवर बोजे बसतील.

आढावा असा
भुसावळ तालुक्यातील 21 पैकी फक्त संत ज्ञानेश्वर, सदगुरू धनजी अर्बन आणि स्वामी समर्थ या तीन पतसंस्थांनी शासन पॅकेज नाकारले आहे, तर 18 पतसंस्थांनी पॅकेज स्वीकारले होते. 18 पैकी केवळ तीन पतसंस्थांनी आतापर्यंत पूर्ण रक्कम भरली. चार पतसंस्थांनी काही रक्कम भरली आहे. 11 पतसंस्थांकडून मात्र प्रतिसाद नाही.
पतसंस्था ठेवीदार घेतलेली रक्कम जमा रक्कम
सप्तशृंगी माता 45 4,39,916 --
बढे सर पतसंस्था 28,644 21,20,65,246 --
ओम अर्बन 111 10,61,018 --
महात्मा फुले 339 30,37,473 8,86,243
महेश मर्चंट 11 1,08,500 1,08,500
श्रीकृष्ण अर्बन 143 13,68,090 --
साईबाबा अर्बन 64 5,15,720 --
कल्याणी अर्बन 06 60,000 60,000
तापी अर्बन 05 50,000 --
देवीदास फालक 23 2,30,000 --
मनुदेवी अर्बन 160 14,33,172 --
रूद्राक्ष अर्बन 01 10,000 10,000
आनंद अर्बन 230 19,61,401 --
जनता अर्बन 180 11,26,156 --
काळा हनुमान 476 46,38,000 50,000
महाकालेश्वर 507 42,54,284 --
विठ्ठल रूख्माई 2,242 1,77,95,856 1,30,000
धनवर्धिनी 864 81,32,319 39,000
एकूण 34,051 25,82,87,151 12,83,743
कार्यवाहीला सुरुवात
- शासन पॅकेजचा निधी परत न देणा-या सर्व पतसंस्थांच्या मालमत्तांवर बोजा बसवणार आहे. यासाठी सहकार विभागाने संबंधित संस्थांच्या स्थावर मालमत्तांचा शोध घेऊन बोजा बसवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आर.आर. शेरे, सहायक निबंधक, भुसावळ