आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेतून पैसे न मिळाल्याने महिलेची अात्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार : मुलाचे लग्न तोंडावर आले असताना बँकेतून पुरेशी रक्कम न मिळाल्याने तालुक्यातील कलमाडी येथील मालूबाई मोतीलाल पाटील (५५) या महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर मृतदेह ताब्यात घेण्यास मृत महिलेच्या नातेवाइकांनी नकार दिला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. 
 
कलमाडी येथील मालूबाई मोतीलाल पाटील यांनी मका विकून ६० हजार रुपयांचा धनादेश बँक अाॅफ बडोदाच्या जनधन योजनेच्या खात्यात जमा केला होता. त्यांना फक्त १० हजार रुपयांचीच रक्कम मिळाली होती.
 
महिन्याला १० हजारच काढता येतील, असे त्यांना बँकेतून सांगण्यात आले होते. त्यामुळे तणावातून मालूबाई पाटील यांनी गुरुवारी आत्महत्या केल्याचा अाराेप नातेवाईक आणि कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात ग्रामस्थांनी गर्दी केली. बँकेतून पुरेशी रक्कम मिळाल्यानेच मालूबाईने आत्महत्या केली असून, दोषींवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा या वेळी ग्रामस्थांनी दिला.
 
 तणाव वाढल्याने गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक गिरीश पाटील घटनास्थळी आले. त्यानंतर कलमाडी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची भेट घेतली. तसेच पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याशी भ्रमणध्वनीने संपर्क साधून त्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. 
 
पालकमंत्री रावल यांनी शेतकऱ्यांना मदतीसह या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मालूबाई यांच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. घटनेनंतर जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून सत्यता जाणून घेतली. बँकेच्या धनादेशाचा आणि आत्महत्येचा संबंध नसल्याचे कलशेट्टी यांनी स्पष्ट केले. पाेलिस ठाण्यातही बँकेतून पैसे मिळणे, मुलाचे लग्न शेतीचे कर्ज यामुळे अात्महत्या केल्याची म्हटले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...