आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यातील बँकेत कोटीची चोरी, ३३ मिनिटांत लांबवले पैसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- बँकेच्या आठ कुलुपांआड सुरक्षित ठेवलेली सुमारे एक कोटीची रोकड तिघा चोरट्यांनी अवघ्या ३३ मिनिटांत सिनेस्टाइलने लुटली. नियोजनबद्धरीत्या लांबविलेल्या या रोकडसाठी कोणतीही बनावट चावी, कुलूप लॉकरची मोडतोड झालेली नाही, हे विशेष! गुटख्याच्या मोठ्या दोन पिशव्यांमधून रोकड लांबविणारे त्रिकूट सातत्याने मोबाइलवर बोलत असल्याचे सीसीटीव्हीने टिपले आहे.
धुळ्यातील बँक ऑफ बडोदात सकाळी नेहमीप्रमाणे शिपाई दाखल झाला. या वेळी बँकेचे कुलूप आत पडलेले असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने व्यवस्थापक शिवलाल मीना यांना कळविले. काही वेळातच पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय ठसेतज्ज्ञ रॉकी या श्वानाला घेऊन पथक आले. श्वानला तिजोरीची कडी कुलुपाचा गंध देण्यात आला. रॉकी या श्वानाने त्याचा आधार घेत पारोळा राेडवर असलेल्या मंदिरापर्यंत माग दाखविला. त्यानंतर श्वानही घुटमळत राहिले.चोरटे वाहनातून पळाले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे.
या घटनेत शुक्रवारी सायंकाळपर्यंत बँकेत जमा झालेली ९६ लाख सहा हजार ११८ रुपये चाेरीस गेले आहेत. दरम्यान, माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, एलसीबीचे निरीक्षक देविदास पाटील, यांच्यासह पोिलस ठाण्याच्या अिधकाऱ्यांनीही पाहणी केली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चहाच्यादुकानावरून क्लू : बँकेच्यामागील बाजूस असलेल्या एका चहाच्या दुकानावरील सीसीटीव्हीने मध्यरात्री दीड ते दोन यादरम्यान संशयास्पद फिरणारी कार िटपली आहे. ही कार अर्ध्या तासात तीनवेळा या भागातून गेली. त्यातील एक व्यक्ती मोबाइलवर बोलत असल्याची प्राथमिक माहिती पोिलसांनी दिली. त्यामुळे बँकेतील ित्रकुटाशी त्याचे संभाषण सुरू होते काय ? असा संशय व्यक्त होत आहे.

चोरट्यांकडे चावी
मध्यरात्री १.३४ वाजता सीसीटीव्हीची नजर चुकवत एक लुटारू बँकेत शिरला. काही वेळातच कानटोपी परिधान केलेले दोघे आत आले. सुरुवातीला आत आलेल्या तरुणाच्या हातात स्ट्राँगरूमची मोठी चावी असते. तिच्या मदतीने तो स्ट्राँगरूममध्ये प्रवेश करतो. दरम्यानच्या काळात एक जण पुन्हा बाहेर जाऊन पाहणी करून येतो; तर इतर दोघे सातत्याने मोबाइलवर बोलत असतात.