आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव जिल्‍हा बॅक निवडणूक २५ मे पूर्वी, राज्यातील २० बँकांच्या निवडणुकांचा बिगुल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यातील२० जिल्हा सहकारी बँकांच्या (डीसीसी) निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.सुधारित सहकार कायद्यानुसार पहिल्यांदाच होणाऱ्या या निवडणुकांमध्ये कोणत्याही सहकारी संस्थेच्या थकबाकीदाराला (डिफॉल्टर) या निवडणुकीत मतदान करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या २५ मेपूर्वी या बँकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. २१ जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत मतदार याद्यांचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चौधरी यांनी सांगितले की, ‘सक्रिय' सदस्यांनाच केवळ मतदानाचा अधिकार देण्याची तरतूद नवीन कायद्यात करण्यात आली आहे.

निवडणूक होणाऱ्या बँका : मुंबई,ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे-नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अकोला, गडचिरोली.

थेट फौजदारी गुन्हे
-"सुधारतिसहकार कायद्याच्या कलम १४६ मधील उपकलमान्वये निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. बेकायदेशीर ठराव मंजूर करणे, संस्थेचे खोटे रेकॉर्ड तयार करणे, खाडाखोड करणे आदी गुन्ह्यांमध्ये फौजदारी कारवाई होईल. यानुसार तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.’ -मधुकर चौधरी,आयुक्त,राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण.

बँकेचा मार्ग मोकळा
२०जिल्हा बँकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राज्य सहकारी बँकेच्या निवडणुकीचा मार्गही मोकळा झाला आहे. नियमानुसार जूनपूर्वी सहकारी बँकांच्या निवडणुका पूर्ण करायच्या आहेत. जिल्हा बँकांची निवडणुका २५ मेपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर राज्य बँकेच्या निवडणूक होईल.