आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक भरतीची यादी प्रसिद्धीपूर्वीच फुटली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची कर्मचारी भरती प्रक्रिया राबविणार्‍या महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने (एमकेसीएल) उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींची यादी प्रसिद्ध करण्यापूर्वीच जिल्हा बॅँकेला पाठवली आहे. 35 जागांसाठीच्या भरतीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत असताना आता 160 जागांसाठी घेण्यात आलेल्या प्रक्रियेतही गैरव्यवहाराच्या उद्देशाने बॅँकेने उत्तीर्ण परीक्षार्थींची यादी मागविल्याचा आरोप काही संचालकांकडून केला आहे.

एमकेसीएलच्या कार्यपद्धतीनुसार ऑनलाइन परीक्षा घेऊन आठवडाभरात ऑनलाइन निकाल जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, परीक्षेनंतर महिना उलटूनही निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.

निकालापूर्वीच परीक्षेतील 387 उत्तीर्ण परीक्षार्थींची निवड यादी (कट ऑफ लिस्ट) जिल्हा बॅँकेला पाठविण्यात आली आहे. बॅँकेला प्राप्त झालेली गोपनिय यादी शुक्रवारी रात्री संचालकांच्या हाती लागली. एमकेसीएलकडून यादी कुणी मागविली? यासंदर्भात माहिती घेण्यासाठी काही संचालकांनी रात्री उशिरा जिल्हा बॅँकेकडे धाव घेतली. त्यात बॅँकेचे उपाध्यक्ष आर.जी. पाटील, डॉ. सतीश देवकर, संजय पवार यांचा समावेश होता. त्या वेळी बॅँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख हेही उपस्थित होते.