आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांद्रा येथे बँकेत दराेडा, १० लाख रुपयांची लूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचाेरा - जळगाव जिल्ह्यातील नांद्रा (ता. पाचाेरा) येथील बँक आॅफ बडाेदाच्या शाखेवर दराेडा टाकून आराेपींनी तिजाेरीतील १० लाख २६ हजार रुपये लंपास केले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. खिडकीचे ग्रील कटरच्या साह्याने ताेडून दराेडेखाेरांनी बँकेत प्रवेश केला. तसेच बँकेत लावलेले सीसीटीव्हीही फाेडून व तिजाेरीच्या सायरनचे वायर कापून त्यांनी हा डल्ला मारल्याचे तपासात समाेर आले आहे. विशेष म्हणजे, या बँकेला पूर्णवेळ सुरक्षा रक्षक नाही.

बुधवारी सकाळी बँकेचे कर्मचारी राजू पाटील हे नेहमीप्रमाणे बँकेत आले असता चाेरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने बँकेचे व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. नंतर पाेलिसांना कळवण्यात आले. पाेलिसांनी श्वानपथकाद्वारे तपासणी केली, मात्र आराेपींचा सुगावा लागू शकला नाही.
यापूर्वीही या बँकेच्या लुटीचा प्रयत्न झाला हाेता. दराेडा टाकण्यापूर्वी बँकेची रेकी दराेडेखाेरांनी केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पाचाेरा पाेलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनीही घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. पाेलिस अधिक तपास करत आहेत.