आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक, एटीएमसमोर रांगा कायम; आजपासून दिवस बँकाही बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - चलनातील ५०० अाणि १००० रुपयांच्या नाेटा बंद करण्याच्या निर्णयाला महिना पूर्ण हाेत असला, तरी पर्यायी व्यवस्था असलेले एटीएम मशीन अजूनही बंदच अाहे. बँकेच्या कॅश काऊंटरवरच सारी भिस्त असल्याने येत्या दिवसांच्या सलग सुट्यांमुळे नागरिकांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत बँकेसमाेर रांगा लावल्या हाेत्या. परंतु, कॅशचा तुटवडा असल्याने बँकांनी १० हजारांएेवजी केवळ हजार रुपयांची कॅश काढण्याच्या मर्यादा लादल्या. कॅशच्या उपलब्धतेनुसार दिवसभर ही मर्यादा कमी अधिक राहिल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. दुसरा शनिवार, रविवार अाणि ईद-ए-मिलाद, साेमवारी दत्त जयंतीची सुटी असल्याने बँका सलग तीन दिवस बंद राहणार अाहेत. यामु‌ळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे.
पर्यायी व्यवस्था असलेले एटीएमदेखील महिन्यापासून बंदच अाहेत. त्यामुळे नागरिकांनी पुढच्या तीन दिवसांची व्यवस्था म्हणून शुक्रवारी बँकेत रांगा लावल्या हाेत्या. बँक खात्यामधून एकावेळी १० हजार तर अाठवड्यातून केवळ २४ हजार रुपये काढण्याची मर्यादा अाहे. शुक्रवारी मात्र बँकांमध्ये कॅशचा तुटवडा असल्याने बँकांनी दरराेज येणारे ग्राहक, उपलब्ध कॅशचे गणित लावून बचत खात्यातून हजार रुपये, चालू खात्यातून हजार रुपये काढण्याची मर्यादा ठेवली. काही बँकांमध्ये ते हजार रुपयांची मर्यादा ठेवण्यात अाली. त्यामुळे अनेक ग्राहक काऊंटवर गेल्यानंतर पैसे काढण्यासाठी असलेल्या धनादेशावर स्लिपवर खाडोखोड करून बँकेने दिलेली रक्कम नाराजीने स्वीकारली.

काही वेळ तुटवडा
^अामच्याकडे कॅशकमी असल्याने सकाळच्या सत्रामध्ये सर्वच ग्राहकांना पैसे मिळाले पाहिजे, म्हणून प्रत्येक खातेदाराला हजार रुपयांपर्यंत कॅश दिली. दुपारनंतर कॅश प्राप्त झाल्याने मर्यादा वाढवली हाेती. एटीएम तांत्रिक अडचणींमुळे सुरू हाेऊ शकले नाही. मनाेजसक्सेना, मुख्य प्रबंधक, सेंट्रल बँक अाॅफ इंडिया

सेंट्रल बँकेत हजारांची मर्यादा
सेंट्रल बँक अाॅफ इंडियामध्ये ग्राहकांनी हजारांपेक्षा अधिकच्या रकमेच्या विड्राॅल स्लिप भरू नये, अशा सूचना देण्यात अाल्या हाेत्या. सेवानिवृत्तांसाठी ही मर्यादा हजार रुपये करण्यात अाली हाेती. अायडीबीअाय, स्टेट बँक अाॅफ इंडियामध्ये १० हजार रुपये काढण्याची मुभा हाेती. जनता बँकेत हजारांची कॅश देण्यात अाली. कॅशच्या उपलब्धतेनुसार दिवसभर मर्यादा कमी-अधिक करण्यात अाली.

पर्यायीव्यवस्था काेलमडल्या
सुट्यांच्या काळात, बँकेवरील ताण कमी करण्यासाठी एटीएमची व्यवस्था असली तरी गेल्या महिनाभरापासून स्टेट बँकेचे एटीएम वगळता इतर बँकांचे एटीएम अजूनही बंदच अाहे. अायडीबीअाय बँकेचे शहरातील एटीएम एकही दिवस सेवा देऊ शकले नाहीत. अॅक्सिस, सेंट्रल बँक, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी, अायसीअायसीअायचे एटीएम अधूनमधून सुरू हाेतेे. बिग बजार, नवजीवन सुपर शाॅपीतील कॅश काऊंटरचा पर्याय काही बँकांचे डेबिट, एटीएम कार्ड सपाेर्ट करत नसल्याने फाेल ठरला.

बातम्या आणखी आहेत...